मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी कर वसुली मोहीम तीव्र केली आहे. कर वसुली न देणाऱ्या मोठ्या मिळकतदारांच्या घरासमोर हलगी वाजवून गांधीगिरी पद्धतीने वसुली सुरू केल्याने थकबाकीदार मिळकतधारकांनी मुख्याधिकारी यांची धास्ती घेतली आहे. दुकानदार, शासकीय कार्यालये सील केली जात आहेत. शहरातील जिल्हा परिषद शाळांचे कर थकीत असल्याने वसुली पथकांनी आपला मोर्चा जि. प. शाळांकडे वळविला.
९ जिल्हा परिषद शाळांचे २ लाख २८ हजार ८२२ रुपये थकीत असल्याने या शाळांमधील मुख्याध्यापक कार्यालय व स्टाफरूम सील करून पालिका प्रशासनाने कर वसुलीत आक्रमकता दाखविल्याने खळबळ उडाली. त्यामुळे गटविकास अधिकारी कवितके यांनी कर भरण्याबाबत लेखी पत्र पथकाला दिल्यानंतर कार्यालये खुली करण्यात आली.
फोटो - कर थकीत असल्याने शहरातील जि. प. शाळा पालिकेच्या कर वसुली पथकाने सील केली.