मार्च महिना संपत आला तरी पालिकेची कर वसुलीला काही मिळकतधारकांचा वसुलीला प्रतिसाद देत नसल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी गांधीगिरी पद्धतीने कर वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मिळकतधारकांचे कर थकीत आहेत. शिवाय वसुली पथकाला प्रतिसाद न देणाऱ्या मिळकतधारकांच्या दारात जाऊन हालगी वाजवली जात आहे. त्यामुळे मिळकतधारक कराची वसुली देत आहेत. कर वसुलीसाठी या अभिनव उपक्रमाची शहरात चर्चा रंगली असलीतरी थकबाकीदार मिळकतधारक या वसुलीची चांगलीच धास्ती घेतली आहेत.
पथकात अनिकेत भोसले, निशिकांत ढाले, अजित दिपंकर, आयुब मतवाल, शशिकांत कडाळे, गिरीधर मधाळे आदी सहभागी झाले होते.
फोटो - १६०३२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - कुरुंदवाड येथील पालिका चौकातील मिळकतधारकांच्या दारात हालगी वाजवून कर वसुली पथकाकडून वसुली सुरु आहे.