शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

कुरुंदवाडची ‘सुपर गर्ल’ निकिता कमलाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:46 AM

गणपती कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : क्रीडा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती महत्त्वाची असते. अशा प्रतिकूल ...

गणपती कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : क्रीडा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती महत्त्वाची असते. अशा प्रतिकूल परिस्थितीवरही मात करीत तेरवाड (ता. शिरोळ) येथील निकिता सुनील कमलाकर हिने पुणे येथे झालेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये १७ वर्षांखालील वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. अपयशाचे खापर परिस्थितीवर फोडणाऱ्या खेळाडूंनी ‘सुपर गर्ल’ निकिताचा आदर्श घेण्यासारखाच आहे.निकिता ही कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत आहे. ती तेरवाड येथील बेघर वसाहतीत राहण्यास असून, वडील सुनील अपंग असूनही संसाराचा गाडा चालविण्यासाठी शेतमजुरी करतात; तर आई शिरोळच्या दत्त साखर कारखान्यातील आरोग्य केंद्रात सेविका आहे. मिळणाºया तुटपुंज्या पगारावर घरचा चरितार्थ चालवितानाही मुलीच्या वाट्याला हलाखीचे जीवन येऊ नये, तिने शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.निकितानेही या परिस्थितीचे भान ठेवून वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याचा ध्यास घेतला आहे. ती येथील हर्क्युलस जिममध्ये जिद्दीने सराव करीत आहे. तिची जिद्द, त्यासाठी ती देत असलेला वेळ, कष्ट ओळखून हर्क्युलस जिमचे प्रमुख प्रदीप पाटील यांनी निकिताला प्रोत्साहन दिले. वेटलिफ्टिंगमध्ये तालुका, जिल्हा व राज्यस्तरांवर विविध पदके मिळविल्याने पुणे येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मधील वेटलिफ्टिंगसाठी १७ वर्षांखालील वयोगटात राज्याच्या संघातून तिची निवड झाली होती. यात तिने ४६ किलो वजनीगटात निकिताने ५२ किलो क्लीन आणि ७१ किलो जर्क, असे १२३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले. बुद्ध्यांक असेल तर अभ्यासातून यश मिळविण्यासाठी घरच्या प्रतिकूल परिस्थितीचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, क्रीडाक्षेत्रात यश मिळविण्यासाठी शरीरयष्टी बलदंड करण्यासाठी खुराक महत्त्वाचा असतो. त्यासाठी आर्थिक परिस्थिती महत्त्वाची असते. निकिताच्या आई-वडिलांनी मात्र मुलगी म्हणून नाक न मुरडता तिच्या जिद्दीला साथ देत परिस्थितीची उणीव भासू न देता पोटाला चिमटा घेत तिला वेळ व खुराक पुरवीत आहेत. याची जाणीव ठेवून निकिताने सुवर्णपदकाची कमाई करीत आई-वडील व शिक्षकांचे प्रयत्न फळास नेले आहे. तिच्या या यशासाठी हर्क्युलस जिमचे प्रदीप पाटील, प्रशिक्षक विजय माळी, विश्वनाथ माळी, रवींद्र चव्हाण, साने गुरुजी विद्यालयाचे संस्थापक रावसाहेब पाटील, मुख्याध्यापक रोहिणी निर्मळे यांनी प्रोत्साहन दिले आहे.आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी व प्रशिक्षकांच्या प्रोत्साहनाच्या बळावर मला आॅलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमधून देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे आहे. हेच माझे अंतिम ध्येय आहे.- निकिता कमलाकर,तेरवाड.