शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडला, मानेत सळी घुसल्याने मजूर ठार; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 1:03 PM

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील कोतवालनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने, आनंद कपूरचंद ...

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील कोतवालनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने, आनंद कपूरचंद मिश्रा (वय २७, सध्या रा.कोतवालनगर, मूळ रा.उत्तर प्रदेश) याच्या मानेत आणि पोटात सळी घुसली. बांधकाम ठेकेदाराने मानेतील सळीसहीत त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना मंगळवारी (दि. २४) सायंकाळी घडली.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, कोतवालनगर येथे सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावर परप्रांतीय मजूर काम करीत आहेत. यातील आनंद मिश्रा याची मंगळवारी सुट्टी होती. दुपारी तो इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मित्रासोबत बोलत बसला होता. काही वेळाने खाली आल्यानंतर त्याला मोबाइल पहिल्या मजल्यावरच राहिल्याचे लक्षात आले. मोबाइल घेऊन परत येताना पाय घसरून तो खाली बांधकामासाठी ठेवलेल्या सळ्यांवर पडला. पोटात आणि मानेत आरपार सळ्या घुसल्याने तो रक्तबंबाळ झाला. या दुर्घटनेमुळे घाबरलेल्या मित्राने याची माहिती इतर मजुरांना आणि ठेकेदार विनोद राठोड यांना दिली. राठोड पोहोचताच जखमी मिश्रा याला मानेतील सळीसहित सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, परप्रांतीय मजुरांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू