शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

मजूर संघ पुन्हा शाहू पॅनेलकडे

By admin | Published: September 24, 2015 12:31 AM

मुकुंद पोवार गटाचा धुव्वा : सर्वच्या सर्व १५ जागा मोठ्या फरकाने विजयी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्था संघाच्या निवडणुकीत उदय जोशी, भीमराव नलवडे व आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत निर्विवाद संघावर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी मुकुंद पोवार यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी मजूर सहकार पॅनेलचा धुव्वा उडाला. मतदार यादीवरून हे प्रकरण थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्याने संघर्ष शिगेला पोहोचला होता. सकाळी आठपासून जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात मतदानास सुरुवात झाली. दुपारी बारापर्यंत ३२७ पैकी ३०० मतदान झाले होते. दुपारी चारपर्यंत १०० टक्के मतदान झाले. दुपारी साडे चारनंतर तिथेच मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच राजर्षी शाहू पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते. महालक्ष्मी पॅनेलचा एकही उमेदवार त्यांच्याजवळ फिरकू शकला नाही. १०० ते १२५ मतांच्या फरकाने शाहू पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. निकालानंतर उदय जोशी यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृष्णा ठाकरे यांनी काम पाहिले. दरम्यान, विजयी उमेदवारांनी प्रमाणपत्रांची मागणी केली; पण जिल्हा उपनिबंधकांच्या नियंत्रणाखाली ही निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने दोन दिवसांत प्रमाणपत्रांचे वाटप करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. पण, उमेदवारांनी त्यांच्याशी हुज्जत घातली.विजयी उमेदवार कंसात मतदान बाळासाहेब जकण्णावर (२०२), उदय जोशी (२०६), प्रवीण नलवडे (२०५) , भीमराव नलवडे (२०४), जयसिंंग पाटील (२०३), सविता पाटील (२०९), सम्राटसिंह पाटील (२०८), संभाजी पाटील २०५), चंद्रकांत सुतार (२०२), महादेव सांगळे (१९८). अनुसूचित जाती - शंकर कांबळे (२११)भटक्या विमुक्त जाती - तानाजी पोवार (२०५)इतर मागासवर्गीय - विजय गुरव (२१६)महिला प्रतिनिधी - शारदा शरद करंबे (२१८), रंजना आप्पासो पाटील (२११).पोवार पिता-पुत्रांचा पराभव मुकुंद पोवार यांचा सर्वसाधारण व भटक्या विमुक्त जाती गटातून पराभव झाला. पोवार यांना स्वत:सह सुपुत्र प्रमोद पोवार यांचाही पराभव रोखता आला नाही. श्री महालक्ष्मी मजूर सहकार पॅनेल (पराभूत)-सर्वसाधारण गट - प्रकाश गोसावी (१०४), लक्ष्मण धोतरे (१०६), तुकाराम पाटील (१०६), महादेव पाटील (१०५), रावसो पाटील (१०४), विलास पाटील (१०५), प्रमोद पोवार (११६), मुकुंद पोवार (११८), तानाजी महाजन (१०९), बयाजी शेळके (११०). अनुसूचित जाती/जमाती - सुभाष देसाई (११६). भटक्या विमुक्त जाती/जमाती - मुकुंद पोवार (१२१). इतर मागासवर्गीय - विजय सुतार (१११). महिला प्रतिनिधी - शारदा पोवार (११९)एकाधिकारशाही, भ्रष्टाचाराच्या सम्राटाला सभासदांच्या साथीने उधळून टाकले. आगामी काळात मजूर संघाचा कारभार स्वच्छ करून संघ राज्यात अग्रेसर बनवू. - उदय जोशी(प्रमुख राजर्षी शाहू पॅनेल) सभासदांचा कौल मान्य आहे. उदय जोशी यांना शुभेच्छा. भाड्याच्या जागेतून स्वमालकीच्या इमारती संघाचे कार्यालय आम्ही नेले, ते त्यांनी चांगले चालवावे. - मुकुंद पोवार(प्रमुख श्री महालक्ष्मी मजूर पॅनेल)