लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : गेले दोन महिने कर्जमाफीची चर्चा व त्या अनुषंगाने होणाऱ्या निर्णयाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले असताना या कर्जमाफी संदर्भातील जसजसे निकष समोर येत आहेत, तसतसे या कर्जमाफीचा लाभ मिळणार का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे. यामुळे दिवसेंदिवस या कर्जमाफीचा सावळागोंधळ वाढत चालला आहे.राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, या मागणीसाठी गेले तीन चार महिने सत्तेवर असणाऱ्या भाजप सरकारला सर्व पक्षांनी एकत्र येऊन कोंडीत पकडण्यासाठी जिवाचे रान केले होते. याला सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना व मित्र पक्षांनीही साथ दिली आहे. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा बिगुल वाजविला पण निकषांचा फासा टाकून कर्जमाफीच्या चक्रव्युहात अडकण्याचे काम केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीतून काढायचेच, अशी खेळी केली आहे. राज्य सरकारने घोषणा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान शेतकरी कर्जमाफीसाठी निकष जाहीर केले आणि सरसकट व थकीत कर्जदारालाच कर्जमाफीच्या सवलत योजनेचा चांगला लाभ होईल, ही आशाच फोल ठरलीकर्जमाफीचे सर्व निकष जाहीर झाल्यानंतर यात एक कुटुंब पकडताना पतीपत्नी व १८ वर्षांखालील मुले अशी व्याख्या करण्यात आली आहे. यात पती व पत्नी अशी दोघांच्या नावावर खाती असली तरी त्याचा स्वतंत्र कर्जमाफीचा फायदा एकाच खातेदाराला मिळणार आहे. यासह अत्यंत खोचक निकष लावताना एकीकडे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिचा विचार केला जाणार नाही, असे म्हणताना स्त्रीला प्राधान्य दिले जाईल व नंतर पुरुषाला असेही सूचित केल्याने नेमकी कुणाला माफी देणार याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. गावागावातील सेवासंस्थातील पदाधिकारी सचिव व खातेदार यांच्यामध्ये निकष व त्यातून आपल्याला कर्जमाफी मिळणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.कर्जमाफीत बुडव्यांनाच फायदा होतोय, असे प्रथमदर्शर्नी दिसून येते. मात्र, यासाठी जाहीर केलेले निकष पाहता आता या माफीतून केवळ सहा ते सात टक्के शेतकऱ्यांनाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. कर्जमाफी द्यावयाची असल्यास सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची पुण्याई मिळवावी.विठ्ठल पाटील, सचिव, हनुमान सेवा संस्था, पाटपन्हाळा.सरकारचा कर्जमाफीचा हेतू शुद्ध नाही. कर्जमाफीचा ३४ हजार कोटींचा आकडा आणि महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता प्रतिव्यक्ती दीड लाख वाटले तरी १६ हजार कोटींवर रक्कम जात नाही, असा दावा केला.संजय पाटील,शेतकरी, वाकरे, ता. करवीर
कर्जमाफीचा सावळागोंधळ ?
By admin | Published: July 04, 2017 12:16 AM