शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

धोरणाअभावी सेवा संस्था थकीतच्या रडारवर

By admin | Published: October 13, 2015 10:42 PM

ऊस दराचे धोरण स्पष्ट नसल्याने सेवा संस्था राहणार थकीत : सरकारने हंगामपूर्व सहकार्याची भूमिका घ्यावी

आयुब मुल्ला - खोची---येणाऱ्या ऊस हंगामात ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर द्यावा, अशा सूचना सरकारने केल्या आहेत. तर वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक कारखानदारांनी ‘एफआरपी’ टप्प्यांनी द्यावी, असा ठराव मंजूर करून घेतला आहे. याउलट स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीची रक्कम तुकडे न करता द्यावी, ही भूमिक ा ठेवली आहे. यासाठी ५० हजार शेतकऱ्यांच्या सह्या संकलित करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. तिन्ही महत्त्वपूर्ण घटकांनी आपल्या वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. सरकार तर या बाबतीत संवेदनशीलच नाही, असे दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील साखरेचे दर पाहता कारखान्याकडून एकाच स्वरूपात एफआरपी पूर्णपणे देता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सेवा संस्थेची कर्जेसुद्धा भागणार नाहीत. सेवा संस्था थकबाकीने अडचणीत येणार, हे स्पष्ट आहे. साखर हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. कारखान्यांचे बॉयलर प्रदीपन सुरू झाले आहेत. कारखाने सुरू करण्यासंदर्भात धोरण स्पष्ट नसताना घाई सुरू आहे. ऊसतोड मजुरांनी दरवाढीची मागणी केली आहे. त्यासंदर्भातही शासनदरबारी ठोस निर्णय झालेला नाही. संघटना वगळता सर्वच घटकांनी सावध भूमिका घेत गप्प राहणे पसंत केले आहे. अशा पार्श्वभूमीवर शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. पावसाच्या हुलकावणीने ऊस पिके खुंटली आहेत. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. अशा स्थितीत उसाला पैसे किती मिळणार? यापासून ते किती वेळेत जाणार, अशा चिंतेत तो आहे. कारण उसाची पक्वता पाहता उत्पादनाची सरासरी वाढेल, असे नाही. प्रती गुंठा एक टन तरी मिळेल का, या विचारात शेतकरी आहे.ऊसतोडणी मजुरांनी तोडणी मजुरीत २० टक्के वाढीसाठी मागणी केली आहे. ती प्रतिटन ३०० रुपये होते, अशी सगळी आर्थिक गणिते आहेत. ती सरकारनेच सोडवली तरच हंगाम वेळेत सुरू होईल. सर्वांनाच हातभार लागेल; पण गत हंगामासारखी चालढकलीची भूमिका घेतली तर एफआरपीची संपूर्ण रक्कम एका वेळेस मिळणार नाही. दोन-तीन टप्प्यांत मिळाली तर सेवा संस्थांची कर्जेसुद्धा भागत नाहीत. एफआरपी : कारखानदारांना कर्ज नको, अनुदान हवेसेवा सोसायटीकडून एकरी ३५ हजारांपर्यंत कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड उसातून होते. यासाठी उसाचा पहिला हप्ता कर्ज भागण्यापुरता सुद्धा येणार नाही, अशी स्थिती आहे. कारण बाजारात साखरेचे दर सध्या दोनशे रुपयांनी वाढून ते २६००-२७०० पर्यंत गेले आहेत. दिवाळीपर्यंत दर वाढत जाऊन त्यामध्ये सातत्य राहिले तर ‘एफआरपी’च्या आसपास दर देण्यासारखी परिस्थिती राहील. परंतु, तो जर तीन हजारांपर्यंत राहिला तर त्यातून ऊस तोडणी खर्च वजा जाता २७५० रुपये देता येईल, अशी स्थिती राहते. त्या रकमेवर आधारित बँका ८० टक्के कर्ज देतात. म्हणजे २२०० वर आकडा येतो. यातून उत्पादन खर्च वजा जाता दोन हजार रुपये देण्यासारखी परिस्थिती येईल. मग ‘एफआरपी’चे काय, असा प्रश्न येतो. यासाठी कारखानदारांनी उर्वरित कमी पडत असलेल्या रकमेसाठी कर्ज न देता अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. गेल्या तीन महिन्यांत पावसाने दडी मारल्याने उसाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होणार आहे. एकरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळेल, असे चित्र आहे. त्यामुळे एकरी ४० हजारांचे पीक कर्ज भागण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सेवा संस्थेकडे थकबाकी राहण्याची शक्यता आहे.- बाबासो श्रीपती पाटील, लाटवडे, शेतकरी.