कोल्हापूर : कमी पैशात एमबीबीएसला प्रवेश देतो, असे सांगून सुमारे एक लाख रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी वसंत गणपती शेटे (रा. प्लॉट नं. ३६,३७. सरस्वती कॉलनी, बालिंगा रोड, कोल्हापूर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार परराज्यातील दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसंत शेटे यांच्या मोबाईलवर एमबीबीएसकरिता ३० लाख रुपयात प्रवेश, अशा वर्णनाच्या इंग्रजीतील जाहिरातीचा मेसेज आला. या मेसेजमधील मोबाईल क्रमांकाची व्यक्ती सोहाना मॅडम यांना शेटे यांनी फोन करून एमबीबीएस प्रवेशाबाबत चर्चा केली.
चर्चेत सोहाना मॅडम यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर बिनयकुमार प्रशान यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी बिजयकुमार प्रधान यांनी, १२ लाख रुपये द्यावे लागतील मगच एमबीबीएसला प्रवेश देऊ असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी शेटे यांनी आपल्या पत्नीच्या नाबे बँक खात्यातून एका बँकेच्या बीडासांशी (कटक) शाखेत बिनयकुमार प्रशान यांच्या नावे एक लाख रुपये भरण्यास सांगितले, त्यानुसार लाख रुपये खात्यावर जमा केले.
पण त्यानंतर एमबीबीएसचे प्रवेश न देता आणखी जादा पैशाची मागणी केली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेटे यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सोहाना मॅडम व बिनयकुमार प्रशान (रा. माचुर्ली, पो. सलेपुर कटक, ओडीसा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.