रुकडी माणगाव : लोकसभेची निवडणूक चुरशीने झाली; पण निवडून कोण येणार? याकरिता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन गटांच्या दोन प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये एक लाखाची पैज लागली आहे. स्वाभिमानी पक्षाचे गोमटेश पाटील (माणगाव) यांनी खासदार शेट्टी यांच्यासाठी, तर येथील अरविंद खोत (माणगाववाडी) यांनी शिवसेनेचे धैर्यशील माने हे निवडून येणार यासाठी एक लाखाची पैज लावली आहे. दोघांनी एक लाखाची रक्कम मध्यस्थ गिरीश शेटे यांच्याकडे सुपूर्द केली असून, या पैजेची चर्चा परिसरात रंगली आहे.हातकणगंले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे विद्यमान खासदार राजू शेट्टी व शिवसेना पक्षाचे धैर्यशील माने यांची प्राथमिक टप्प्यात लढत ही एकतर्फी होईल, अशी स्थिती होती. यामुळे खासदार शेट्टी एकतर्फी निवडून येतील, असा अंदाज बऱ्याचजणांचा होता, पण भाजप-शिवसेनेने प्रचारात जोरदार मुसंडी मारत खासदार शेट्टी यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जखडून ठेवण्यात यश मिळविले. पंतप्रधान मोदींना राजू शेट्टींनी केलेल्या थेट विरोधामुळे मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपने सर्व नियोजन करून येथील लढत दुरंगी होण्याकरिता सर्व ताकद पणाला लावली.इचलकरंजी येथील वारणा पाणी प्रश्न, ब्राह्मण समाजाबाबतचे वक्तव्य आणि ‘सायलेंट झोन’मध्ये पसरविलेले जातीचे कार्ड यामुळे ही एकतर्फी वाटणारी लढत काटाजोड झाल्याने विजयाबाबत चर्चा रंगली आहे. अनेक कार्यकर्त्यांना धैर्यशील माने धक्कादायक निकाल देऊ शकतात असा ठाम विश्वास आहे, तर ‘कितीही ताण... येणार नाही बाण’ ही टॅगलाईन घेऊन, तर ‘शेट्टी नाही जातीचा तो आहे मातीचा’ हा प्रचाराचा मुद्दा असल्याने काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या बळावर राजू शेट्टी निवडून येणार, असा आत्मविश्वास स्वाभिमानीचे कार्यकर्ते दाखवत असल्याने निकालाच्या अगोदरच येथील वातावरण ‘टाईट’ झाले आहे.त्यातच या मतदारसंघातील निकालाबाबत दोन कार्यकर्त्यांत तब्बल एक लाख रुपयांची पैज लागल्यंने निकालाबाबत आणखी उत्सुकता ताणली आहे.दोघेही कार्यकर्ते विजयावर ठामस्वाभिमानी पक्षाचे गोमटेश पाटील (माणगाव) व उद्योजक अरविंद खोत (माणगाववाडी) यांच्यात एक लाखाची पैजगोमटेश पाटील यांना राजू शेट्टी यांच्या विजयाची खात्री, तर खोत यांना धैर्यशील माने निवडून येतील हा विश्वास.सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत काटाजोड झाल्याने विजयाबाबत चर्चा रंगली आहे.
लोकसभेच्या निकालावर लागली लाखाची पैज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:43 AM