कोल्हापूर : महापुराचा वेढा पडलेल्या कामगार चाळीस महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. नवीन कामगार चाळ बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉलजवळील पूरग्रस्त परिसराची प्रशासक बलकवडे व माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली यावेळी जयंती नालालगत रेटेनिंग वॉलसाठी त्वरित बजेट नियोजन तसेच कामगार चाळ नवीन बांधण्याकरिता प्रस्ताव तयार करू, असे बलकवडे यांनी सांगितले. पंचनामा करण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी श्रमिक हॉल येथे पूरग्रस्तांची चौकशी करून दिलासा दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपअभियंता नारायण भोसले, अशपाक आजरेकर, आराेग्य निरीक्षक मनोज लोट, कोल्हापूर महानगपालिकेचे अधिकारी विकी कांबळे, रोहित माजगावकर, विकास माजगावकर, किरण कांबळे, अरुण गेजगे, वसीम शेख, मुबारक मुल्ला, सनी कांबळे, नितीश पंडित, नितीश जेधे उपस्थित होते.