शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
2
सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
3
डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...
4
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
5
धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
6
स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)
7
'तुमची मंजू माई 'ऑस्कर'पर्यंत पोहचली...', 'लापता लेडीज' फेम छाया कदम यांची खास पोस्ट
8
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
9
ENG vs AUS : इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला; यजमानांना घाम फुटला पण कर्णधाराने बदला घेतला
10
Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव
11
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
12
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
13
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
14
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
15
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
16
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
17
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
18
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
20
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या

लालपरीच्या वाहक-प्रवाशांची ‘ति’किटकिट कमी होणार!, कोल्हापूर विभागात अद्ययावत तिकीट मशीन दाखल

By सचिन भोसले | Published: August 04, 2023 5:23 PM

नव्या तिकीट मशीनमुळे वाहकांना पैसे आणि तिकीटाचा ताळमेळ एका क्लिकवर घालता येणार

सचिन भोसलेकोल्हापूर : एस. टी. महामंडळाने कोल्हापूर विभागासाठी अद्ययावत जीपीआरएस यंत्रणेस जोडलेली १७५२ इलेक्ट्राॅनिक तिकीट इश्यू मशीन दिली आहेत. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह संभाजीनगर आणि इचलकरंजीतील वाहकांना ती देण्यात आली आहेत. नव्या तिकीट मशीनमुळे वाहकांना पैसे आणि तिकीटाचा ताळमेळ एका क्लिकवर घालता येणार आहे.लालपरीच्या वाहकांना यापूर्वी प्रवासादरम्यान जुन्या पद्धतीच्या एटीआयएम मशीनद्वारे प्रवाशांना तिकीट तत्काळ देताना अडचणी निर्माण होत होत्या. प्रवाशाच्या इप्सितस्थळ आले तरी या पूर्वीच्या मशीनमधून तिकीट मिळत नव्हते. त्यामुळे प्रवाशांचे तिकिटावरून वाहकाशी वाद निर्माण होत होते. अनेकदा तिकीट ट्रेचा वापर करून प्रसंगी प्रवाशांना योग्य तिकीट द्यावे लागत होते.या त्रासासोबत अचानक तिकीट तपासणी अधिकाऱ्यांनी बसमधील प्रवाशांची तिकीटे तपासली की मशीनच्या दिरंगाईमुळे कारवाईची भीती होती. या सर्व बाबींचा विचार करून महामंडळाच्या प्रशासनाने कोल्हापूर विभागासाठी १७५२ अद्ययावत मशीन दिली आहेत. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह संभाजीनगर, इचलकरंजी या स्थानकातील वाहकांना ती वापरण्यास देण्यात आली आहेत. अद्ययावत मशीनमुळे वाहकांना दिलासा मिळाला आहे.एटीआयएम मशीन अशी,हे मशीन प्रत्येक वाहकाला त्याच्या नावावर दिले जाणार आहे. त्याचे नाव, मार्ग, तिकीट दर, स्त्री, की पुरुष, अमृत योजना, पंच पास, सवलत असेल तर त्याकरीता वेगळी तरतूद, एस.टी. बस नेमकी कोठे आहे, तिकीटानुसार किती प्रवासी आहेत,ॲड्राईड बेस, नेटवर्क कनेक्टिव्हीटी, जीपीआरएसला जोडणी, अशी ही एटीआयएम मशीन आहे. संबधित वाहक कर्तव्य बजावून बाहेर पडताना हिशेबाचा ताळमेळ एका क्लिकवर मिळणार, अशी तरतूद या मशीनमध्ये आहे.

ही मशीन पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह संभाजीनगर, इचलकरंजी आगारातील वाहकांना दिली आहेत. आलेल्या मशीनमध्ये अद्ययावत डाटा भरण्याचे काम सुरू आहे. लवकरच ती उर्वरित आगारांतून वितरीत केली जातील. - अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एस.टी.महामंडळ, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर