कोल्हापूर : जरगनगरात बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने अडीच लाखांच्या दागिन्यांसह अन्य ऐवज लंपास केला. याबाबतची फिर्याद विजय तुकाराम नार्वेकर (वय ४०, रा. सध्या रा. लेआऊट क्रमांक ी, बाबा जरगनगर, मूळ रा. शेळप, गवसे, ता. आजरा) यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार करवीर पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला.
फिर्यादी नार्वेकर हे रघुनाथ सूर्यवंशी यांच्या जरगनगरातील घरात भाड्याने राहतात. दरम्यान, मंगळवारी (दि.११) रात्री सव्वादहा ते बुधवारी सकाळी ८ या दरम्यान अज्ञाताने नार्वेकर यांच्या घराचे गेट व बंद दरवाजाचे कुलूप तोडून दोन तोळ्याचे सोन्याचे बिस्कीट, दोन तोळ्याचे लाॅकेट, एक तोळ्याची सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाचे साेन्याचे मंगळसूत्र आणि सॅमसंग कंपनीचा मोबाइल, असा २ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या चोरीची नोंद करवीर पोलिसांत झाली असून, पोलीस निरीक्षक सुनील कोळेकर तपास करीत आहेत.