कदमवाडी : लाईन बझारमधील सेवा रुग्णालयात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून, महिला डॉक्टरची पर्स चोरीला गेली आहे. एकाच महिन्यात सेवा रुग्णालयात दुसऱ्यांदा चोरी झाली आहे. चोरटा रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रुग्णालय आणि परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असूनही रुग्णालयात येणारे रुग्ण व नातेवाईक यांचे साहित्य चोरीला जात आहे. बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांची तपासणी करत असताना महिला डाॅक्टर बारवाडे यांची पर्स टेबलवरून लंपास केली. यात रोख रक्कम ३० हजार रुपये, दोन एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड व पॅन कार्ड होते. दरम्यान, चोरट्याने आधी रुग्णालयात येऊन पाहणी केली. संबंधित डॉक्टरांच्या केबिनबाहेरही तो टेहळणी करत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.