कोल्हापूर : येथील शाहू मैदान बसस्टॉपवरून एका महिलेचा रोकडसह सुमारे एक लाखाहून अधिक रकमेचा ऐवज अज्ञाताने नजर चुकवून चोरून नेला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. याबाबत सरिता भारतराज निंबाळकर (वय ५८ रा. हनुमाननगर, पाचगाव रोड, कोल्हापूर, मूळ रा. कलनाकवाडी, ता. भुदरगड) यांनी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाचगाव रोडवरील सरिता निंबाळकर या कोल्हापूर शहरात काही कामानिमित्त आल्या होत्या, त्याचवेळी त्या शाहू मैदान बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्यांच्याकडील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, २ ग्रॅम वजनाची कर्णफुले, २.५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तसेच १५ हजाराची रोकड असा सुमारे एक लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.