शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
4
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
6
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
7
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
8
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
9
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
10
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
11
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
12
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
13
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
14
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
15
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
16
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
17
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
18
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
19
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
20
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले

Kolhapur: शिरोली-अंकली महामार्गासाठी लवकरच भूसंपादन होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 2:21 PM

कोल्हापूर : शिरोली ते अंकली या नव्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गासाठी लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. भूसंपादनाची ही प्रक्रिया तातडीने ...

कोल्हापूर : शिरोली ते अंकली या नव्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गासाठी लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. भूसंपादनाची ही प्रक्रिया तातडीने करून महामार्गाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या दृष्टीने तयारी करा, अशा सूचना खासदार धैर्यशील माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. माने यांनी तीन राष्ट्रीय महामार्गांसंबंधातील अडचणींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शेतकरी, ग्रामस्थांच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी माने म्हणाले, कोल्हापूर-सांगली हा प्रचंड वाहतुकीचा रस्ता असूनही तो राज्य मार्ग होता. त्याचेही काम पूर्णपणे मार्गी लागले नव्हते. त्यामुळे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करून शिरोली ते सांगली रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर या रस्त्याच्या चौपदरीकरणासही मजुरी मिळाली असून, त्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्षांना भेटून भूसंपादनाची परवानगी सुद्धा मिळविण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर व अन्य अधिकारी, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी विवेक काळे, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्याचे भूसंपादन अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. महसूल, भूसंपादन विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने या रस्त्याचे भूसंपादन लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही माने यांनी दिल्या. आंबा, पैजारवाडी चौकात या रस्त्याच्या कामामध्ये असणाऱ्या शासकीय अडथळ्यांचे निराकरण करण्यासही त्यांनी सांगितले.

शिरोली-कासेगाव दरम्यानच्या गावांत अधिकारी जाणारराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ कागल-सातारा या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या शिरोली ते कासेगाव मार्गावरील गावांतील नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्याही यावेळी जाणून घेण्यात आल्या. दि. २ डिसेंबरला प्रत्येक गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील समस्यांची पाहणी करून निराकरण करण्याच्या सूचना माने यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पुलाची शिरोली, वडगाव, घुणकी, किणी, कणेगाव, येलूर, वाघवाडी, पेठ नाका व कासेगाव येथील शेतकरी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग