हातकणंगले : हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयातील काही कर्मचारी व अधिकाºयांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला असून, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना बसत आहे. हातकणंगले येथील एका शेतकºयाच्या एकाच गटाचे दोन वेगवेगळे नकाशे देऊन दोन शेतकऱ्यांमध्ये वाद घडविण्याचे प्रकार होत आहेत.कमर्चाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत असून एका एका कामासाठी दहा ते पंधरा वेळा हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
भूमी अभिलेख कार्यालयात तालुक्यातील ६२ गावांतील शेतकरी गट नकाशे, मोजणी, रस्त्याचे वादविवाद, मालमत्ता उतारे, फाळणी नकाशे यासह इतर कामासाठी येतात. मात्र, तालुका कार्यालयामध्ये कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये बेबनाव असल्यामुळे कोणीही सहकार्यासाठी पुढे येत नाही. नक्कल मागणीचे अर्ज पंधरा दिवसांपासून दोन दोन महिने पडून असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दुपारच्या सत्रामध्ये कोणीच कर्मचारी भेटत नाही. कार्यालयातील कर्मचाºयांवर आधिकाºयांचा कसलाही अंकुश नसल्याने तालुक्यातील नागरिकांची ससेहोलपट होत आहे . याकडे जिल्हा अधीक्षकांनी संबंधित कर्मचाºयांवर कारवाई करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबविण्याची मागणी होत आहे.कोणत्याही कामासाठी दहा-पंधरा हेलपाटे1 तालुक्यातील ६२ गावांतील नागरिकांची राहत्या घरांची व शेतीशी निगडीत कामे या कार्यालयात आसतात. प्रॉपर्र्टी कार्डावरील कमी - जास्तीच्या नोंदीसह सात-बारा उताºयांशी निगडित व हद्द कायम मोजणीच्या कामासाठी रोज शेकडो नागरिक येत असतात.2 चाळीस ते पन्नास कि. मी. पायपीठ व प्रवास करून येणाºया नागरिकांना कामाची माहिती व्यवस्थित मिळणे अपेक्षित असते; पण येथील काही कर्मचारी व अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन पाठवितात, तर काहीजण सुरुवातीपासूनच चार-आठ दिवसोनी या, असे पोकळ आश्वासन देऊन अक्षरश: हाकलून लावतात. कोणत्याही कामासाठी कमीत कमी दहा ते पंधरा हेलपाटे मारायला लावतात3 नकाशा, एकत्रीकरण तक्ता, टिप्पन उतारा, सर्व्हे नंबर, गट मोजणीसाठी लागणारी कागदपत्रांची नक्कल मागणी अर्ज केल्यानंतर ही कागदपत्रे मिळविण्यासाठी नागरिक हवालदिल होऊन मागेल तितके पैसे देऊन सुद्धा हेलपाटे मारून काकुळतीला येतात. सांगितलेल्या तारखेला येऊनसुद्धा नकला मिळत नाहीत. कार्यालयातील कर्मचाºयांमध्ये कसलीही एकवाक्यता नसल्याने त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत.
नागरिकांची पिळवणूक थांबवाकाही कमर्चारी व अधिकारी कधीही वेळेत उपस्थित नसतात. नागरिकांनी उलट विचारणा केल्यास उलट दमबाजी करतात. या सर्व प्रकाराकडे जिल्हा अधीक्षकांनी लक्ष घालून या गैरप्रकाराला आळा घालून शेतकरी व नागरिकांची पिळवणूक थांबविण्याची मागणी होत आहे.