ढेंगेवाडी (ता.राधानगरी) येथील डोंगरमाथ्यावर धुवांधार पावसामुळे सावर्डे पाटणकर व ढेंगेवाडी या गावचा सीमेवर तांबर नावाच्या शेतात सुमारे तीनशे फूट एवढ्या मोठ्या अंतराचा डोंगरभाग खाली येऊन भूस्खलन झालेले आहे.त्यामुळे भात,भुईमूग, नाचणी व गवत ही पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
यामध्ये विलास आदमापुरे, बाबुराव आदमापुरे,भिकाजी आदमापुरे,साताप्पा आदमापुरे,शिवाजी तुकाराम आदमापुरे,कुंडलिक आदमापुरे, तानाजी आदमापुरे, मीनाक्षी आदमापुरे, शांताबाई आदमापुरे या ढेंगेवाडी येथील तर संभाजी शामराव चव्हाण या सावर्डे पाटणकर येथील शेतकऱ्यांचे शेत मोठ्या प्रमाणात तुटून गेले आहे
घटनास्थळी तलाठी दिगंबर कांबळे, ग्रामसेवक बाबुराव तावडे, उपसरपंच बाळासो आदमापुरे, पोलीस पाटील रघुनाथ बाईत व ग्रामस्थांनी भेट देऊन पाहणी केली.