गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे सामानगडावरील रस्त्यालगतच्या डोंगरकडांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे त्या परिसरातील चार कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. भू-स्खलनासंदर्भातील अहवाल भू-गर्भशास्त्र विभागाला तातडीने पाठविण्याच्या सूचना प्रांतांनी यावेळी तहसीलदारांना दिली.
दरम्यान, प्रांताधिकारी पांगारकर व तहसीलदार पारगे यांनी घटनास्थळाला समक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी चिंचेवाडीचे उपसरपंच संदीप नाईक, पोलीसपाटील सुरेश गुरव, ग्रामसेवक संजय पुकळे, रणजित चौगुले, सुभाष घेवडे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------------------
भूगर्भतज्ज्ञांना बोलविणार..!
सामानगडावरील भूस्खलन नेमके कशामुळे झाले आहे याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. त्यासाठी भूगर्भतज्ज्ञांना पाचारण करण्यात येईल. अशी माहिती प्रांताधिकारी पांगारकर यांनी दिली.
-------------------------
फोटो ओळी : किल्ले सामानगड येथे भू-स्खलन झालेल्या भागाची प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार दिनेश पारगे यांनी पाहणी केली. यावेळी संदीप नाईक, सुरेश गुरव, संजय पुकळे, रणजित चौगुले, सुभाष घेवडे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २७०७२०२१-गड-१५