तालुक्यातील श्री धोपेश्वर मंदिरामागील डोंगराचा भाग दरी व मंदिराच्या दिशेने कोसळला. यामध्ये मंदिराची पूर्वेकडील भिंत, स्वयंपाक घर, बैठक खोली पडून चार लाखांचे नुकसान झाले. पुजारी जंगम त्या रात्री मुख्य मंदिराच्या माळ्यावर झोपल्याने बचावले. विशाळगडावरील भगवंतेश्वर मंदिरामागील भोसले वाडीतील टेकडीचा भाग सहा फुटांपर्यंत खचला. येथील सात कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. काही ठिकाणी भेगा पडल्याचे शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बंडू भोसले यांनी स्पष्ट केले.
मानोली व हुंबवलीच्या जंगलाशेजारील दरीच्या भाग झाडासह कोसळला. घोळसवडे येथील मोहिते मळ्यातील तीनशे फूट मातीची धड कोसळल्याने शंकर पाटील यांची दोन एकर भात शेती माती खाली गेली तर मोहिते यांची विहीर मुजली आहे. लव्हाळा वाकोली दरम्यानची टेकडी खचून रस्ताला भेगा पडली आहे. सुमारे साठ फूट रस्त्यांची हानी झाली आहे.
२५ धोपेश्वर मंदिर भूस्खलन
फोटो ओळी
धोपेश्वर मंदिराच्या डोंगराचा दरीकडील भाग भूस्खलन झाला.