कोल्हापूर : सलग तिसऱ्यादिवशी गेल्या २४ तासांत कोल्हापूर जिल्हयात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असून, नवे ८१ रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ४० रुग्णांचा समावेश आहे. एकूणच वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता, उद्या जिल्हा प्रशासन याबाबत गांभीर्याने काही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गगनबावडा तालुक्यात एक, कागल तालुक्यात दोन, राधानगरी तालुक्यात दोन, हातकणंगले तालुक्यात दोन, करवीर तालुक्यात दहा, नगरपालिका क्षेत्रातील अठरा रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
दिवसभरात ४०५ जणांची तपासणी करण्यात आली असून, १,२२९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १४३ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली असून, ४६६ जणांवर उपचार सुरू आहेत, तर २४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
चौकट
सोमवारी होणार प्रशासनाची बैठक
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, सोमवारी जिल्हा प्रशासन याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे. ही दुसरी लाट येण्याची चिन्हे असल्याने याबाबत काही तातडीचे निर्णय घेतले जातील, असे सांगण्यात आले.