कसबे डिग्रज : येथील हजरत पीर गैबीसाब, इमामशा, तानपीरसाब यांच्या उरुसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात मोरणा केसरी संग्राम पोळ आणि उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील यांच्या कुस्तीत नुसतीच खडाखडी झाली. वासिम पठाण, कसबे डिग्रज आणि बाळू पुजारी, इचलकरंजी यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. त्यामुळे सुमारे पाच हजार कुस्ती शौकिनांची निराशा झाली; पण त्याचबरोबर उरुसाच्या जाहिरातीत नावे असलेल्या अनेक मान्यवरांनी गैरहजेरीची चर्चा होती.इतर पन्नासवर चटकदार कुस्त्या झाल्या. त्यांच्यावर मोठ्या बक्षिसांची खैरात शौकिनांनी केली. आसिफ मुलाणी माने छडी टांगवर गणेश मधाळेवर मात केली, तर पवनकुमार करंटे याने विश्वजित केंचे यास अस्मान दाखविले. सुदर्शन पाटीलनेही चटकदार विजय मिळविला. प्रवीण अपराध याने ‘बॅक थ्रो’ या दुर्मीळ डावावर राम कांबळे यास चितपट केले. या कुस्तीत विविध मंडळांच्यावतीने चषक, ढाल देण्यात आली.त्याचप्रमाणे तानाजी चव्हाण, दीपक सिंग, दत्तात्रय वाळपुंजे, सागर तारळे, ओंकार येवले, सोहेल नरदेकर, रोहित शिंदे, सुशांत काटकर, प्रशांत रजपूत, स्वप्निल कदम, सुजित कदम, संकेत परीट, सुबोध पाटील या पैलवानांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.पंच म्हणून अमृता भोसले, राजेंद्र जाधव, रामदास बागडी, विकास जाधव, युवराज खांडेकर, विनायक जाधव, आदींनी काम पाहिले. माजी आमदार नितीन शिंदे, नामदेवराव मोहिते, कुस्ती कोच उत्तमराव पाटील, भीमराव माने, राहुल महाडिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी संतोष पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य विशाल चौगुले, राजेंद्र जाधव, अण्णासाहेब सायमोते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.ज्ञानदेव सूर्यवंशी, स्वप्निल नलवडे, निवास सुतार, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी संयोजन केले, तर दीपक साठे, वैभव साठे यांच्या हलगीपथकाने मैदानात रंगत आणली. (वार्ताहर)
मोठ्या कुस्त्या बरोबरीत
By admin | Published: March 25, 2015 12:28 AM