शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

नव्या वर्षाचा जल्लोष जरा जपून; कोल्हापूर शहर, जिल्ह्यात नाकाबंदी, कडेकोट बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 1:17 PM

पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोठडीतच नव्या वर्षाचे स्वागत करावे लागेल

कोल्हापूर : सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. ३१ डिसेंबर साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार, घटना घडू नये, अपघात, हाणामारी, टवाळखोरी आणि हुल्लडबाजी होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त नेमला आहे. शनिवारी दुपारी चारपासूनच पोलिस चौकाचौकांत थांबून वाहनांची तपासणी करणार आहेत. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना ताब्यात घेऊन कडक कारवाई केली जाणार आहे. सुमारे दीड हजार पोलिस कर्मचारी आणि ३०० होमगार्डचे जवान तैनात करण्यात येणार आहे.सरत्या वर्षाला निरोप देण्यासह नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करताना अनेकांकडून पार्टीचे आयोजन केले जाते. रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या रंगीत, संगीत पार्ट्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: मद्य प्राशन करून बेदरकारपणे वाहने चालवणे, रस्त्यावर गोंधळ घालून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, विनापरवाना रात्री उशिरापर्यंत ध्वनियंत्रणा सुरू ठेवून विनाकारण त्रास देणे असे प्रकार होतात. यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.उघड्यावर बसून कोणीही मद्य प्राशन करू नये, यासाठी पोलिसांकडून ओपन बारवर कारवाया करण्याची मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरही पोलिसांची नजर आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन किंवा जल्लोष करण्यावर निर्बंध घातले आहेत. वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर आणि गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.निर्भया पथकांचीही सार्वजनिक ठिकाणी नजर राहणार आहे. महिला आणि तरुणींची छेडछाड रोखण्याचे काम निर्भया पथकांकडून होणार आहे. ड्रंक अँड ड्राइव्हची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना ब्रेथ ॲनालायझर पुरवले आहेत. पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोठडीतच नव्या वर्षाचे स्वागत करावे लागेल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसNew Yearनववर्ष