रुकडी माणगाव : रुकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी लस देण्यात येणार आहे ही माहिती गावात कळताच नागरिकांनी रात्री तीनपासून रांगा लावण्यास सुरूवात केली होती. ही रांग प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शिवाजी चौकापर्यंत पोहचली. पहाटेपासून नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागेल. रुकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस कधी उपलब्ध होईल याचा काही भरवसा नसल्याने लस उपलब्ध होताच आशा कर्मचारी त्याच्या प्रभागानुसारच नागरिकांना बोलवून घेत लसीकरणाची मोहीम राबविले. पण प्रत्यक्षात येथे उपलब्ध लस दीडशे आणि उपस्थित तीनशे अशी परिस्थिती झाल्याने बरेच नागरिकांना परत परतावे लागले. दरम्यान गुरूवारी उपलब्ध लस पैकी एकशे साठ जणांना लस देण्यात आले आहे. रूकडी येथे २१० रूग्ण कोरानाने बाधित होते यापैकी ११५ रूग्ण बरे झाले असून चौदा रूग्ण मयत असून वीस रूग्ण घरी तर ६१ रूग्ण विविध दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत.
रुकडी येथे लसीसाठी मोठी रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:24 AM