नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे श्री गंगामाता गृहतारण संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी संचालक भय्या कुपेकर होते.
संस्थेचे सभापती रवळू पाटील यांनी स्वागत केले.
गराडे म्हणाले, शैक्षणिक व सामाजिक कार्याची आवड असलेल्या राजकारणविरहीत तळमळीच्या माणसांनी एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली आहे. यापूर्वी शिक्षक पतसंस्था उत्तमरीत्या चालवून आदर्श निर्माण केला आहे. संस्थेचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. या वेळी शिक्षक नेते शंकर मनवाडकर व कृष्णराव वाईंगडे यांनी मनोगते केली.
या वेळी शाल, श्रीफळ व पुस्तके भेट देऊन मान्यवरांचा सत्कार झाला. याप्रसंगी सरपंच आशिष साखरे, जोतीबा भिकले, सूर्यकांत देसाई, कार्तिक कोलेकर, संतोष जोशी, बालाराम शिपूरकर, विश्वास रेडेकर, उमेश दळवी, संजय दावणे, शुभांगी नाईक, मोहन पाटील, कमल देसाई, महादेव कोयले, साधना कुंभार, लक्ष्मीकांत नाईक आदी उपस्थित होते. कृष्णा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राणबा नाईक यांनी आभार मानले.
फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) श्री गंगामाता गृहतारण संस्थेचे उद्घाटन अमित गराडे यांच्या हस्ते झाले. या वेळी भय्या कुपेकर, आशिष साखरे, रवळू पाटील, एस. एन. देसाई, वसंतराव पाटील आदी उपस्थित होते.
क्रमांक : २३०९२०२१-गड-०७