कोल्हापूर : येथील गंगावेश ते शिवाजी पूल म्हणजे आखरी रस्त्यामधील शुक्रवार गेट ते जामदार क्लबपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याचे काम पावसापूर्वी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या दिरंगाईमुळे या रस्त्याचे काम दीड वर्षाहून अधिक काळ रखडले आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी आखरी रास्ता कृती समितीच्या शिष्टमंडळातर्फे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची भेट घेऊन १५ जूनपूर्वी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करा, अशी मागणी केली आहे.
ड्रेनेज वाहिनींचे काम अर्धवट असल्याने डांबरीकरण करता आलेले नाही. पावसाळ्यानंतरच हे काम केले जाईल असे प्रभारी नगर अभियंता नारायण भोसले यांनी सांगितले. कृती समितीचा पाठपुरावा आणि जनरेट्यामुळे आखरी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. निधीही उपलब्ध करण्यात आला. पिण्यासाठीच्या पाण्याची आणि ड्रेनजची पाईपलाईन टाकून रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील काही भाग डांबरीकरण करण्यात आला. पण शुक्रवार गेट ते जामदार क्लबपर्यंतच्या रस्त्याचे काम दीड वर्षापासून रखडले. या अर्धा किलोमीटरच्या रस्त्याची दयनीय आहे. उन्हात धूळ आणि पावसात चिखल, असे चित्र तिथे असते. याच रस्त्यावरून पंचगंगा स्मशानभूमीकडेही जावे लागते. महापालिकेचे हॉस्पिटलही आहे. कोकणात वाहनेही येथूनच जातात. परिणामी नेहमी वाहनांची वर्दळ असते. म्हणून १५ जूनपूर्वी या रस्त्याचे काम न झाल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत पुन्हा रेंगाळणार आहे.
कोट
आखरी रस्ता होण्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील रस्त्याचे डांबरीकरण झाले
आहे. शुक्रवारगेट ते जामदार क्लबपर्यंतच्या रस्त्याचा मधला भाग रखडला आहे. दीड वर्षापासून रस्त्याच्या दैना उडाली आहे.
किशोर घाटगे,
निमंत्रक, आखरी रास्ता कृती समिती
चौकट
दोन महापौर, सहा नगरसेवक तरीही
आखरी रस्त्याच्या कार्यक्षेत्रात दोन महापौर, सहा नगरसेवक होऊन गेले. शिवाय, हा रस्ता मुख्य आहे. तरीही याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. व्यापारी आस्थापने अधिक असल्याने नगरसेवकांचे मतदार कमी आहेत. म्हणून हा रस्ता चांगला करण्यात कुणाला रस नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या शहरातील रस्त्याची पाणंद झाली आहे.
(फोटो स्वतंत्र देत आहे)