शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शाहूकालीन घाट मोजतोय अखेरच्या घटका

By admin | Published: August 12, 2016 12:05 AM

कृष्णातीरी संस्थानिक वास्तू : गैरसोयींमुळे भाविकांतून नाराजीचा सूर; लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्रश्न प्रलंबित

संतोष बामणे-- जयसिंगपूर -उदगाव (ता. शिरोळ) येथील जागृत श्री रामलिंग देवस्थान हे मंंदिर अकराव्या शतकातील असून, कृष्णा नदीकाठावर शाहूकालीन दगडी प्रशस्त घाट आहे. मात्र, या घाटाला सध्या अवकळा आली आहे. अनेक वर्षांपासून हा सुधारण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, कन्यागतच्या निधीतून येथील दत्त मंदिर व रामलिंग मंदिराला भेट देण्यासाठी हजारो भाविक येणार आहेत. त्यामुळे येथील गैरसोयींमुळे भाविकांतून नाराजीचा सूर उमटणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याची हद्द उदगाव येथून सुरू होते. सांगली, सोलापूर, पुणे, सातारा, अहमदनगर, आदी जिल्ह्यांसह अनेक राज्यांतून नृसिंहवाडीला भाविक दाखल होणार आहेत. या भाविकांना प्रथम कृष्णातीरी स्नानाची सोय व्हावी, या अनुषंगाने येथे गैरसोयीचाच विळखा भाविकांना घ्यावा लागणार आहे. येथील पुरातन रामलिंग व दत्त मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या अखत्याराखाली असलेली मंदिरे आहेत. मात्र, त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे़ त्यामुळे येथे घाट असून, गैरसोय अशी अवस्था या घाटाची झाली आहे. कन्यागतच्या पार्श्वभूमीवर अकरा घाटांप्रमाणे याही घाटाला निधी उपलब्ध करणे गरजेचे होते़ मात्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. येथे इंदुमती सरकार यांचे निवासस्थान व राजर्षी शाहू महाराज यांचे हंगामी निवासस्थान आहे. या ठिकाणी घोड्याच्या पागा, बंगला, तालीम, घाट अशा वास्तू आहेत. सध्या त्याची इतिहासात व संस्थांनी काळात नोंद आहे. येथील रामलिंग व दत्त मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे नमूद असून, घाटाप्रमाणे याही मंदिराकडे समितीचे याकडे दुर्लक्ष आहे. येथील मंदिर हे श्री राम सीतेच्या शोधासाठी जात असताना या ठिकाणी वास्तव्य करून येथे महादेवाची स्थापना केली आहे. त्यामुळे शाहू महाराज यांनी या परिसराची जोपासना केली होती. उदगाव येथे शाहू काळात संस्थानी जकात नाका व धान्य कोठार होते. उदगाव हे सांगली-कोल्हापूर व मिरज-कोल्हापूर लोहमार्गावर असून, रेल्वे मार्गाचे काम चालू असताना रेल्वे मार्गाला वळण देऊन शाहू महाराज यांनी या मंदिराचा बचाव केला. त्या काळात मिरज येथील रानडे बंधूंनी घाट व दत्त मंदिर बांधले होते. मात्र, सध्या घाट व मंदिर दुरवस्थेत आहे.गेल्या काही वर्षांपासून रामलिंग व दत्त मंदिराचा घाट सुधारण्यासाठी ग्रामस्थांची मागणी होत आहे. सध्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उदगावचे तिन्हीही घाट दुरवस्थेत आहेत. त्यामुळे कन्यागतच्या पार्श्वभूमीवर या घाटांचे बांधकाम होणे गरजेचे होते. मात्र, हे होऊ शकले नाही. त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. - बाळासाहेब कोळी, अध्यक्ष उदगाव सेवा सोसायटीकृष्णा नदीकाठावरील उदगावच्या शाहूकालीन घाटाला सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. हा घाट सुधारण्यासाठी वारंवार पाठपुरावा करीत आहे. येत्या काही दिवसांतच यासाठी चांगला निधी उपलब्ध करणार आहे. तसेच लवकरच हा घाट सुसज्ज करून नागरिकांच्या सेवेत देणार आहे. - राजू शेट्टी, खासदार