कोल्हापूर : ‘सर्वाधिक बक्षिसांची स्पर्धा’ म्हणून गणल्या गेलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील अनेक धावपटूंसह सर्वसामान्य नागरिकांनीही नावनोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीचा अंतिम काउंटडाऊन सुरूझाला आहे. नावनोंदणीची अंतिम मुदत उद्या, शनिवारपर्यंत आहे.‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वासाठी धुमधडाक्यात सुरूअसलेली नोंदणी अंतिम टप्प्यांत आली आहे. कोल्हापुरात गेले दोन वर्षांपासून ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्ध तंदुरुस्त राहावेत, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाते.पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारी २०२० रोजी पहाटे पाच वाजता ‘लोकमत मॅरेथॉन’ची सुरुवात होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन’, १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे. सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल. सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे.विविध पाच गटांमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. त्यासह धावपटूंना आकर्षक मेडलही मिळणार आहे. वैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्यांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा.ग्रुप बुकिंगवर विशेष सवलत...‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये ग्रुप बुकिंगवर विशेष सवलत देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शाळा, महाविद्यालय, खासगी संस्था, बँका, विविध सामाजिक संस्था यांनी एकत्र बुकिंग केल्यास त्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. ग्रुप बुकिंगवर त्यांच्या ग्रुपचे फोटोही ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केले जाणार आहेत.
खंडपीठाचा प्रश्न जनमानसापर्यंत रुजविण्यासाठी आम्ही लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहोत. आजच्या जमान्यात आपण चालणे, धावणे पूर्णपणे विसरलो आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने नागरिकांना धावण्याची उत्कृ ष्ट संधी मिळाली आहे.अॅड. रणजित गावडे, अध्यक्ष जिल्हा बार असोसिएशन
‘लोकमत’च्या महामॅरेथॉनमुळे आम्हाला अशा प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. आजच्या धकाधकीच्या युगात फिटनेस टिकविण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन होणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ची महामॅरेथॉन स्पर्धा ही राज्यात अव्वल व दर्जेदार म्हणून गणली जात आहे.- अरुण चौगले, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी
अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधाया महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा. या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-२’ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे.
- ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
- १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
- २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट