राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारच्या कर्जमाफीनंतर दहा वर्षाने राज्याने कर्जमाफी जाहीर केली आहे; पण जिल्हा बँकेशी संलग्न कर्जपुरवठा व थकबाकीदारांची संख्या पाहिली तर गेल्या दहा वर्षांत जवळपास ३७ हजार शेतकरी पुन्हा थकबाकीदार झाले असून, त्यांचे २८० कोटींचे कर्ज थकले आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारने २००८ ला देशातील शेतकऱ्यांना तब्बल ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली होती. सततची नापिकी व शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिसेंबर २००७ अखेर थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा व धाडसी निर्णय घेतला होता. कर्ज थकविणाऱ्यांनाच कर्जमाफी दिल्याने राज्यात कमालीचा असंतोष पसरल्याने राज्य सरकारने प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीस हजार रुपयांची सरसकट कर्जमाफी केली. जिल्हा बँकेच्या पातळीवर केंद्राच्या कर्जमाफीतून २७४ कोटींची कर्जमाफी झाली. त्यातील ‘नाबार्ड’ने ११२ कोटी अपात्र ठरविले होते. अपात्र रकमेपैकी सुमारे ४७ कोटींची वसुली बँक पातळीवर झालेली आहे. त्यामुळे सध्याच्या ३४५ कोटींच्या थकबाकीत अपात्रमधील ६५ कोटी दिसत आहेत. ढोबळमानाने गेल्या दहा वर्षांत ३७ हजार शेतकऱ्यांकडे २८० कोटी थकल्याचे स्पष्ट होते. पाच एकरांवरील३७८४ थकबाकीदारराज्य सरकारने पाच एकराच्या आतील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याने जिल्ह्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे; पण जिल्हा बँकेचे पाच एकरावरील ३ हजार ७८४ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे पीक कर्ज व मध्यम मुदतीचे तब्बल २२ कोटी १० लाखाची थकीत कर्ज आहे. या शेतकऱ्यांच्या वसुलीचा मोठा प्रश्न जिल्हा बँकेसमोर आहे. दृष्टिक्षेपात केंद्राची कर्जमाफीथकबाकी - १ एप्रिल १९९७ ते ३१ डिसेंबर २००७ पर्यंतजिल्हा बँकेने सादर केलेला प्रस्ताव - २ लाख ९ हजार३१९ शेतकरीरक्कम - २९३ कोटी ७८ लाख मंजूर - २७४ कोटी अपात्र- ११२ कोटी (४४ हजार ६५९ खाती)प्रत्यक्षात लाभ- १६१ कोटी ११ लाख जिल्हा बँकेचे कर्ज वाटपपाच एकरांपर्यंतशेतकरी - २ लाख ९ हजार ५११कर्ज- १५१५ कोटीपाच एकरांवरीलशेतकरी-५६ हजार ९२कर्ज-४८४ कोटी
दहा वर्षांत २८० कोटींचे कर्ज थकले
By admin | Published: June 13, 2017 1:09 AM