लोकमत न्यूज नेटवर्क
वारणानगर : वारणा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्ष स्व. शोभाताई कोरे या महिलांसाठी प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन सभेच्या अध्यक्ष स्नेहाताई निपुणराव कोरे यांनी केले.
येथील श्री वारणा भगिनी मंडळ संस्थेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण पार पडली. मागील वर्षात कोरोना असूनही संस्थेने विविध खाद्यपदार्थ व स्टॉलच्या माध्यमातून २ कोटी १३ लाख ९१ हजारांची उलाढाल केल्याचे स्नेहाताई कोरे यांनी सांगून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. सुरेखा शहापुरे यांनी सहकारी संस्थेची प्रगती कशी करावी व जीवनशैली या विषयावर मार्गदर्शन केले. विद्या टकले यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. शर्मिला कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर नोटीस व इतिवृत्त वाचन हेमनंदा पाटील व वर्षा आपटे यांनी केले. संस्थेच्या सचिव कल्पना पडवळ व व्यवस्थापक जालंदर पोवार यांना ‘आदर्श कामगार पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले. या सभेला सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्ष शुभलक्ष्मी विनय कोरे, वारणा महिला पतसंस्था संचालिका व भगिनी मंडळाच्या संचालिका उपस्थित होत्या. माधवी देशपांडे यांनी आभार मानले.
....
फोटो ओळ - वारणा भगिनी मंडळाच्या वार्षिक सभेत स्नेहाताई कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शुभलक्ष्मी कोरे, सुरेखा शहापुरे, शारदा महाजन, कल्पना पडवळ, सुलोचना खाडे आदी संचालिका उपस्थित होत्या.