शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाजीराव पाटील प्रमुख उपस्थित होते. खासदार मंडलिक यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजनामधून पूरहानी व अतिवृष्टी या योजनेतून राज्य महामार्ग क्रमांक १९४ ला मिळणारा रस्ता व हरिजन वस्तीलगत संरक्षण भिंत व रस्त्यासाठी ३७ लाख रुपये व गटारीसाठी दहा लाख रुपये असा एकूण ४७ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे माजी सरपंच सुरेश पाटील यांनी सांगितले. डॉ. एम. बी. किडगावकर यांनी स्वागत केले. अर्जुन पाटील यांनी आभार मानले. यावेळी उपसरपंच धनाजी पाटील, प्रकाश पाटील, सतीश कुरणे, बत्तासोा चौगले, रणजित पाटील, राजाराम कासार, कृष्णात जासूद, सुरेश पाटील, बत्तासो एकशिंगे, एकनाथ दळवी, अनिल चोपडे, योगेश कांबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळ
निगवे दुमाला येथे विकासकामांचा शुभारंभ करताना खासदार संजय मंडलिक, सरपंच सुवर्णा एकशिंगे, बाजीराव पाटील, सुरेश पाटील आदी मान्यवर.