कोल्हापूर : गरजू कोरोना रूग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर पुरवण्याच्या सेवेचा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.यावेळी शाहू छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, शाहू ब्लड बंकेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखाराव, सतीशराज जगदाळे उपस्थित होते.हे कॉन्स्ट्रेटर विनामुल्य वापरण्यासाठी दिले जाणार असले तरी त्यासाठी १५ हजार रूपये अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. जी नंतर पावती दाखवून परत मिळू शकेल. डॉक्टरांच्या लेखी पत्रानुसारच कॉन्स्ट्रेटर दिले जाणार आहे.
परस्पर अन्य रूग्णाला देण्यास मनाई असून डॉक्टरांच्या लेखी पत्रानुसार १४ दिवसांहून अधिक काळासाठीही कॉन्स्ट्रेटर दिला जाणार आहे. परतीवेळी मात्र मास्क आणि ऑक्सिजन पाईप बदलावी लागत असल्याने ५०० रूपये भरावे लागणार आहेत. शाहू ब्लड बँकेतच हे कॉन्स्ट्रेटर मिळणार आहेत.