'बोलेरो'ने एसयूव्ही
श्रेणीमध्ये नव्याने भर घातली आहे. भारतात सर्वत्र महिंद्राच्या वितरकांकडे आजपासून उपलब्ध
होणाऱ्या नवीन 'बोलेरो निओ'ची 'एन ४' या प्रकारातील मॉडेलची किंमत ८.४८ लाख रु. (एक्सशोरूम ऑल इंडिया) इतकी आहे. 'बोलेरो निओ' सादर झाल्यानंतर, 'बोलेरो एसयूव्ही पोर्टफोलिओ'मध्ये आता ग्राहकांसाठी 'बोलेरो' आणि नव्या पिढीच्या
ग्राहकांसाठी दणदणीत 'बोलेरो निओ मॉडेल, हे दोन प्रकार उपलब्ध झाले आहेत. याबाबत ट्रेन्डी व्हीलचे मुख्य कार्यकारी संचालक उदय लोखंडे म्हणाले, “बोलेरो ब्रॅण्डला निष्ठावान ग्राहकवर्ग मोठ्या संख्येने लाभला आहे. या गाडीने दोन दशकांहून अधिक काळ भारतीय रस्त्यांवर राज्य केले आहे. नवीन बोलेरो निओ'चे डिझाईन, तिची कामगिरी व तिच्यामधील प्रगत अभियांत्रिकी ही वैशिष्ट्ये बोलेरोच्या मूळ गुणसूत्रांशी जुळतात. 'बोलेरो निओ' ही नव्या पिढीच्या ग्राहकांसाठी बनविली गेली आहे. यामध्ये स्टाईलिश नवीन डिझाईन, इटालियन ऑटोमोटिव्ह डिझायनर पिनिनफरीना यांनी तयार केलेले प्रिमियम इंटिरियर, आरामदायी केबिन आणि सुरक्षा तंत्रज्ञान, ड्युअल एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेक
डिस्ट्रिव्युशन व कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल असलेली अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम व आयसोफिक्स चाईल्ड सीट यांचा समावेश आहे. यावेळी व्यवस्थापकीय संचालक सत्यजित लोखंडे, गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, अमित पाटील, विश्वास पाटील, पंडित भोसले, अवधूत कुलकर्णी उपस्थित होते.
फोटो : १६ शिरोली महिंद्रा बोलेरो
ट्रेन्डी व्हील येथे बोलेरो निओ गाडीचे लाॅंचिंगप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, उदय लोखंडे, सत्यजित लोखंडे, बाळासाहेब खाडे आदी.