यड्राव : यड्राव (ता. शिरोळ) येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सप्टेंबर अखेर चालणाऱ्या राष्ट्रीय पोषण आहार अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. अभियाना अंतर्गत गावातून प्रबोधनफेरी काढण्यात आली. राष्ट्रीय पोषण आहार अभियाना अंतर्गत दररोज पोषण आहार रॅली, वृक्षारोपण, घोषवाक्य स्पर्धा, परसबाग, कोविड लसीकरणबाबत जनजागृती, मातृवंदना सप्ताह, गर्भवती व स्तनदा मातांसाठी कोविड लसीकरण शिबीर, पोषण आहार समुपदेशन, पाच मिनिटे योगा प्रोटोकॉल प्रशिक्षण, कुपोषित मुलांना आहार वाटप असे विविध उपक्रम या कालावधीत राबविण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम जांभळी बीट सुपरवायझर अर्चना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमास डॉ. लीना बाबर, किरण एरंडोले उपस्थित होते. स्वागत व प्रास्तविक रुपाली हळाळे तर मनीषा ढोबळे यांनी आभार मानले.
फोटो - ०५०९२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळी - यड्राव (ता. शिरोळ) येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत गावातून प्रबोधनफेरी काढण्यात आली. याप्रसंगी आरोग्य विभागाचे कर्मचारी, व आशा सेविका उपस्थित होत्या.