शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

World Environment Day : पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती उपक्रमास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 4:03 PM

पर्यावरण बदलाचे संकट कोरोनापेक्षा कैकपटींनी मोठे आहे, याची जाणीव करून देण्यासाठी कोल्हापुरात एका आगळ्यावेगळ्या उपक्रमास प्रारंभ झाला.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती उपक्रमास प्रारंभजागतिक पर्यावरण दिन : शाहू महाराज यांच्या हस्ते मोहीम

कोल्हापूर : पर्यावरण बदलाचे संकट कोरोनापेक्षा कैकपटींनी मोठे आहे, याची जाणीव करून देण्यासाठी कोल्हापुरात एका आगळ्यावेगळ्या उपक्रमास प्रारंभ झाला.न्यू पॅलेस येथील राजवाड्यात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर आणि फ्रायडेज फॉर फ्युचर, कोल्हापूर यांच्यातर्फे पर्यावरण जनजागृतीसाठी हा विशेष उपक्रम पार पडला.असा आहे उपक्रमपर्यावरणसंबंधी एक चित्रफीत तयार करण्यात आली असून त्यासोबत एक प्रश्नावली आहे. ती सोडवल्यास शिवाजी विद्यापीठाचे इ-सर्टिफिकेट सहभागी होणाऱ्या प्रत्येकास मिळणार आहे. या चित्रफितीमधून नागरिकांनी प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणावा, असा यामागे प्रयत्न आहे.या उपक्रमाचा प्रारंभ करताना शाहू छत्रपती यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, औद्योगिक क्रांती झाल्यामुळे मानवाचे कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आज आपल्याला त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. येत्या काळात भारतासमोर असलेल्या प्रश्नांपैकी मुख्य प्रश्न पाणी आणि प्रदूषणाचा आहे. पर्यावरणाचे आरोग्य राखले गेले तरच पुढची पिढी चांगले आयुष्य जगू शकेल आणि त्यासाठी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.मागील पिढीने केलेली चूक पुसून टाकणे आणि पुन्हा तसे न होऊ देणे अशा प्रातिनिधिक स्वरूपात मातीमध्ये उमटलेली मानवाची पावले मिटवून या उपक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण उद‌्घाटन करण्यात आले.वैयक्तिक स्तरावर कार्बन फूटप्रिंट कमी करणे आवश्यक असून त्यासाठी रिड्युस, रियूज आणि रिसायकल असा मंत्र प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे, असे सांगत फ्रायडेज फॉर फ्युचर, कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रमुख नितीन डोईफोडे यांनी या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.याप्रसंगी ॲड. रवी शिराळकर, सागर बकरे, सविता पाटील, योगेश माळी, सारिका बकरे, धीरज चौगुले, अरुणा डोईफोडे, सौरभ कापडिया आणि अथर्व डोईफोडे उपस्थित होते. 

टॅग्स :World Environment DayWorld Environment DayShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर