मुरगुड : हळदवडे, ता.कागल येथे हसन मुश्रीफ सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात सुमारे चारशे रुग्णांची तपासणी करण्यात आली.याशिवाय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून मिळालेल्या दहा लाख निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
विविध विकासकामांचा शुभारंभ व आरोग्य शिबिराचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडले.अध्यक्षस्थानी शशिकांत खोत होते.यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास पाटील व कागल तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश शिंदे प्रमुख उपस्थित होते. कोरोना काळात चांगले काम करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला तसेच कापशीमध्ये उत्कृष्ट कोविड सेंटर चालवल्याबद्दल शशिकांत खोत यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे स्वागत अस्मिता भराडे यांनी केले तर प्रास्ताविक बाळासोा भराडे यांनी केले. यावेळी रंगराव भराडे, ग्रा.पं. सदस्य नेताजी इंदलकर,अश्विनी इंदलकर,विजयमाला भराडे , करंजीवणे सरपंच दगडू शेटके, आनंदा मोरे, भिकाजी भराडे,शामराव बैलकर, रंगराव आसवले,एकनाथ पोवार,रामचंद्र भराडे,भैरु साबळे,नारायण भराडे ,नामदेव आसवले,पांडुरंग भराडे या प्रमुखासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार संजय भराडे यांनी मानले.