शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

पालिकेच्या धर्मशाळेवर कूळ कायदा ?

By admin | Published: November 18, 2014 9:27 PM

हस्तांतरणास शासनाकडून टाळाटाळ : गडहिंग्लज प्रांतकचेरीसाठी भाड्याने घेतलेली इमारत

राम मगदूम -- गडहिंग्लज-  ५० वर्षांपूर्वी प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी भाड्याने घेतलेली गडहिंग्लज नगरपालिकेची धर्मशाळा इमारत आणि जागा वेळोवेळी मागणी करूनही पालिकेकडे हस्तांतरण करण्यास शासन टाळाटाळ करीत आहे. त्याठिकाणी ‘व्यापारी संकुल’ उभारणीचे काम रखडले आहे. ठरविलेले नाममात्र भाडेही २३ वर्षांपासून थकीत असून, ‘त्या’ जागेवरील कब्जा कायम ठेवण्यासाठी कूळ कायदाच लावण्याची शंका व्यक्त होत आहे.पालिका कार्यालयाच्या इमारतीनजीक बसस्थानकासमोरील ही मोक्याची जागा व सार्वजनिक सरकारी धर्मशाळा अनेक वर्षांपासून गडहिंग्लज नगरपालिकेच्या वहिवाटीत असून, प्रॉपर्टी कार्डात तशी नोंददेखील आहे. दुकानगाळे बांधण्यासाठी विकास आराखड्यात ती जागा आरक्षित आहे. जागाच ताब्यात न मिळाल्यामुळे निधी मिळूनदेखील पालिकेला दुकानगाळे बांधता आले नाहीत.जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक अर्ज-विनंत्या झाल्या, बैठकाही झाल्या; मात्र ही जागा सोडण्यास शासन तयार नाही. त्यामुळे आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी धडपडणाऱ्या पालिकेची कोंडी झाली असून, सरकारने ही जागा विनाअट पालिकेच्या ताब्यात द्यावी, अशी गडहिंग्लजकरांची मागणी आहे.वीजमंडळाची जागा परत मिळालीसध्या भाजीमंडई असलेली भडगाव रोडवरील जागादेखील पूर्वी वीजमंडळाने भाड्याने घेतली होती. अनेक वर्षे प्रयत्न करूनदेखील तीही परत मिळत नव्हती. मात्र, स्व. बाबासाहेब कुपेकरांनी शासन दरबारी अथक प्रयत्न करून ती नगरपालिकेला मिळवून दिली. त्याप्रमाणे आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपली ताकद लावून प्रांतकचेरीची जागा परत मिळवून द्यावी, अशी गडहिंग्लजकरांची अपेक्षा आहे.कब्जेपट्टी - ५ एप्रिल १९६१ रोजी नगरपालिकेकडून प्रांतकचेरीसाठी धर्मशाळा इमारत ताब्यात घेताना करण्यात आलेली कब्जेपट्टी पावती.गडहिंग्लज बसस्थानकासमोरील याच सार्वजनिक सरकारी धर्मशाळा इमारतीत ५४ वर्षांपासून प्रांतकचेरी सुरू आहे.वरिष्ठ पातळीवरच निर्णयसार्वजनिक सर्व जागांची मालकी शेवटी शासनाचीच असते. सुरुवातीपासून याच इमारतीमध्ये प्रांत कार्यालय आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरच निर्णय होईल.- डॉ. कुणाल खेमणार, सहायक जिल्हाधिकारी, गडहिंग्लजपालिकेची जागा परत मिळावीजनतेसाठी गावात प्रांतकचेरी सुरू होतेय म्हणून नगरपालिकेने आपल्या मालकीची धर्मशाळेची इमारत दोन वर्षांसाठी भाड्याने दिली होती. उत्पन्नाचा स्रोत म्हणून त्याठिकाणी व्यापारी संकुल बांधणार आहोत. शासनाने ती जागा नगरपालिकेला परत द्यावी.- लक्ष्मी घुगरे, नगराध्यक्षा, गडहिंग्लजभाडे १४६, थकबाकी ४०,८९८१७ जून १९५९ रोजी तत्कालीन कलेक्टरनी म्युनिसिपालिटीचे तत्कालीन प्रेसिडेंटना समक्ष विनंती केली. त्यानुसार जनतेच्या सोयीसाठी होणाऱ्या प्रांत कचेरीसाठी दोन वर्षे मुदतीकरिता सर्क्युलर मिटिंगने मंजुरी घेऊन १४६ इतक्या नाममात्र भाड्याने ही इमारत देण्यात आली. मात्र, मार्च २०१५ पर्यंतचे ४०,८९८ रुपये इतके भाडे अद्याप थकीत आहे.