लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : समाजव्यवस्था त्यातील वंचित घटक आणि न्याय व्यवस्था यामध्ये झटपट त्वरित न्याय पोहोचण्याची जबाबदारी ‘कायद्याचा मित्र’ म्हणून विधि स्वयंसेवकांनी उचलावी, असे प्रतिपादन जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. ए. लव्हेकर यांनी केले. न्याय व विधि सेवा प्राधिकरणाच्यावतीने सोमवारी जिल्हा न्यायालयात आयोजित केलेल्या विधि स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.शिबिरामध्ये जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत शिंदे यांनी विधि सेवा प्राधिकरणाच्या मोफत कायदेशीर सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले तर जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी शिबिरातील पीएलव्हीची कर्तव्याची माहिती दिली. विधि सेवेचा बॅन्ड अॅम्बॅसीडर रेहान नदाफ याने मनोगत व्यक्त केले. यावेळी सरकारी वकील विवेक शुक्ल, अॅड. शिवाजीराव राणे, व्ही. एन. घाटगे, किरण खटावकर, निखिल इनामदार, पल्लवी थोरात, भाग्यश्री बारबोले, योगीता हरणे, इरफान पटेल, सारिका तोडकर, वैशाली सव्वाखडे, शुभांगी निंबाळकर, तस्कीन पटेल, गौरी पाटील, जावेद फुलवाले, ज्योती भालकर, सुनील बाबर, सर्जेराव सावंत, ज्ञानेश्वर मिरजकर, गुरुदास येळावडेकर, सारिका शिंदे, अनिकेत मोहिते, आदी उपस्थित होते.कोल्हापूर जिल्हा न्याय व विधि सेवा प्राधिकरणाच्यावतीने सोमवारी जिल्हा न्यायालयात आयोजित विधि स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. ए. लव्हेकर. डावीकडून विधि प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे, विवेक शुक्ल, प्रशांत शिंदे.
विधि स्वयंसेवक कायद्याचा मित्र--न्यायाधीश लव्हेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:23 AM
कोल्हापूर : समाजव्यवस्था त्यातील वंचित घटक आणि न्याय व्यवस्था यामध्ये झटपट त्वरित न्याय पोहोचण्याची जबाबदारी
ठळक मुद्दे : विधि स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिर उत्साहात