कोल्हापूर : भाजपला रोखण्यासाठी दोन्ही कॉँग्रेसनी एकसंध होण्याचा निर्णय घेतला; पण कोल्हापुरात आघाडीतील बिघाडी कायम राहिली. कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात प्रचार सुरू आहे. या उलट प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, माजी आमदार बजरंग देसाई हे महाडिक यांच्या प्रचारात ताकदीने सक्रिय आहेत.कोल्हापूर मतदारसंघात राष्टÑवादी व कॉँग्रेस भक्कम आहे. येथे सहापैकी आघाडीचे दोन आमदार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखाने, दूध संघाच्या संचालकांची ताकद पाहिली तर युतीपेक्षा ते कितीतरी पटींनी वरचढ आहेत. दोन्ही कॉँग्रेस एकसंध राहिल्या तर काय निकाल लागतो, हे २०१४ च्या मोदी लाटेत साऱ्या महाराष्टÑाला कोल्हापूरने दाखवून दिले होते; पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. महाडिक यांच्या प्रचाराच्या मुद्द्यावरून कॉँग्रेस दुभंगली आहे. सतेज पाटील यांनी उघड विरोध करीत शिवसेनेच्या मागे सगळी रसद लावली आहे. पी. एन. पाटील, भरमूअण्णा पाटील, बजरंग देसाई, प्रल्हाद चव्हाण हे प्रचारात सक्रिय झाले. एकंदरीत येथे आघाडी धर्माची ऐसी की तैसी अशीच स्थिती पहावयास मिळते. तरीही आघाडीचे नेते व कार्यकर्ते प्रचंड ताकदीने प्रचारात उतरल्याचे सध्या दिसत आहे.पॅचअप झालेच नाहीपश्चिम महाराष्टÑात आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात उघड प्रचार करणारे सतेज पाटील हे कॉँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. त्यांना पॅचअप करण्याचा प्रयत्न खुद्द शरद पवार यांनी केला; पण पाटील यांच्या विरोधाची धार वाढतच गेली.विधानसभा मतदारसंघातील मित्रपक्षांचे प्रचारात सक्रिय नेते१. कोल्हापूर उत्तर : कॉँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महिला शहराध्यक्ष संध्या घोटणे यांच्यासह काही पदाधिकारी प्रचारात सक्रिय. कॉँग्रेसचे नगरसेवक व काही पदाधिकारी शिवसेनेच्या प्रचारात.२. कोल्हापूर दक्षिण : सतेज पाटील यांच्यासह सगळी कॉँग्रेस शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय.३. करवीर : पी. एन. पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, उदयानी साळुंखे, करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, पन्हाळा तालुकाध्यक्ष जयसिंग हिर्डेकर हे आघाडीसोबत आहेत. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांची वेट अॅँड वॉचची भूमिका. गगनबावडा तालुकाध्यक्ष बजरंग पाटील शिवसेनेसोबत आहेत.४. राधानगरी-भुदरगड : बजरंग देसाई, शामराव देसाई, उदयसिंह पाटील, अरुण डोंगळे, पी. डी. धुंदरे, हिंदुराव चौगले, सुप्रिया साळोखे आघाडीसोबत; तर विजयसिंह मोरे शिवसेनेच्या प्रचारात.५. कागल : तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे आघाडीसोबत आहेत.६. चंदगड : भरमूअण्णा पाटील, गडहिग्ंलज तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील, आजरा तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर आघाडीसोबत आहेत. जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, अंजना रेडेकर शिवसेनेसोबत आहेत.
आघाडी धर्माला हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:43 AM