शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

गडहिंग्लजमध्ये नेते ‘सावध’..उमेदवार ‘संभ्रमात’..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 12:04 AM

नगरपालिका निवडणुका : एकमेकांच्या हालचालींवरच सर्वांचे ‘लक्ष्य’

राम मगदूम -- गडहिंग्लजगडहिंग्लजमध्ये उमेदवाराबरोबरच मतदारही संभ्रमात असून, नेते मात्र सावध आहेत. सर्वच राजकीय पक्ष व गटांनी एकमेकांवर लक्ष ठेवून हालचाली गतिमान केल्या आहेत. बेरीज-वजाबाकीच्या राजकारणामुळे संभाव्य उमेदवार संभ्रमात, तर नेते सावध, असे चित्र आहे. संभाव्य आघाड्यासाठीही उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.गेल्या चार दशकांत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण? सत्ताधाऱ्यांच्या बाजूने कोण? याचा अंदाज बांधणे सोपे होते. उघड हालचालींवरूनच त्यावेळी निवडणुकीतील संभाव्य उमेदवार आणि लढतीचे संभाव्य चित्र स्पष्ट होत आले. मात्र, सर्वार्थाने वेगळी ठरलेल्या या निवडणुकीचे सारे संदर्भच बदलून गेल्यामुळे पालिकेच्या राजकीय सारिपाटावर संभ्रमाचे ढग तयार झाले आहेत. गतवेळी तत्कालीन सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य काँगे्रस यांच्या आघाडीविरुद्ध शहापूरकर गटाच्या सहकार्याने राष्ट्रवादीने आघाडी केली अन् सत्तांतरही घडविले. मात्र, काठावरील बहुमतामुळे मिळालेली सत्ता राष्ट्रवादीला पाच वर्षे टिकविता आली नाही. साडेतीन वर्षानंतर ‘राष्ट्रवादी’च्या सुंदराबाई बिलावरांच्या पाठिंब्यावर जनता दलाने पालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि जनता दल हे दोघेही यावेळी ‘सत्ताधारी भूमिकेत’ आहेत. ऐतिहासिक ठरलेले हे सत्तांतर संभ्रमावस्थेचे पहिले कारण आहे.दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत नगरपालिकेतील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे जनता दल व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष नाट्यमयरीत्या एकत्र आले आणि त्यांच्या पॅनेलला यशही मिळाले. मात्र, ती ‘युती’ न रुचलेल्या राष्ट्रवादीच्या ‘काही’ नगरसेवकांची नाराजी आजअखेर कायम राहिली. त्याचे पडसाददेखील वेळोवेळी उमटले. त्यामुळेच पालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी व जनता दलाची ‘बहुचर्चित’ युती अद्याप दृष्टिपथात नाही. किंबहुना, ती दुरापास्तही ठरली आहे, हे या संभ्रमावस्थेचे दुसरे कारण.गडहिंग्लज कारखाना निवडणुकीत मुश्रीफ-शिंदेच्या विरोधात ऐनवेळी एकत्र आलेले शहापूरकर व चव्हाण या दोघांनीही अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, त्यापूर्वीच ‘जनसुराज्य’चे माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, तर आठवड्यापूर्वीच माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर हे देखील भाजपवाशी झाले आहेत. रिंगणे हे चव्हाणांचे सहकारी, तर यमगेकरांना शहापूरकरांनी भाजपमध्ये आणले आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर रिंगणे व यमगेकर दोघांनीही दावा केल्यामुळे विरोधी ‘महाआघाडी’चे नेतृत्व असणाऱ्या भाजपमध्येच ‘पेच’ निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेना व स्वाभिमानी या मित्रपक्षांसह तिसरा पर्याय देऊ इच्छिणाऱ्या ‘महाआघाडी’चे चित्रही अद्याप दृष्टिक्षेपात नाही, हे संभ्रमावस्थेचे तिसरे कारण आहे.