लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : शेतकऱ्यांसह विविध प्रश्न हाताळण्यात हे शासन पूर्णपणे अपयशी ठरले असून, आघाडीच्या माध्यमातून आम्ही समस्त कोकणवासियांच्या पाठीशी ठाम उभे राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार सुनील तटकरे यांनी राजापूर येथील जवाहर चौकात आयोजित सभेत दिली.विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, समाजवादी पक्ष व शेकाप यांच्या संघर्ष यात्रेचे राजापुरात आगमन झाले. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, हे शासन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार नाही. त्याविरुध्द काँग्रेससह विरोधी पक्षांनी राज्यव्यापी संघर्ष यात्रा सुरु केली असून, अखेरच्या टप्प्यात तिचे आगमन राजापुरात झाले. या यात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे - पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, आमदार भाई जगताप, जोगेंद्र कवाडे, आमदार हुस्नबानू खलिफे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हरिश रोग्ये यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.रत्नागिरीहून आलेल्या या संघर्ष यात्रेचे पाली, लांजा, ओणी, राजापूर तालीमनाका येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर ती यात्रा जवाहर चौकात आली व त्याठिकाणी एक छोटीसी सभा झाली. त्यावेळी उपस्थिती अत्यल्प होती.सुरुवातीला आमदार हुस्नबानू खलिफे यांनी सर्वांचे स्वागत करून यात्रेचा हेतू विषद केला. त्यानंतर उपस्थितांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. हे शासन कृषी, मत्य व्यवसाय, बागायती, महामार्ग अशा सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असून, आघाडी शासनाच्या काळात भात पिकाला चांगला भाव मिळायचा, शिवाय बोनसही दिला जात असे. मात्र, युती शासनाच्या काळात कोकणवासीयांची उपेक्षा झाली असल्याचे तटकरे म्हणाले.आघाडीच्या माध्यमातून आम्ही कोकणवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू व हे कोकण समृध्द व्हावे, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची पाठचशेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राज्यव्यापी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेला इतरत्र चांगला प्रतिसाद लाभत असताना राजापुरात मात्र दोन्ही काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनीच या यात्रेकडे पाठ फिरवली. शहरवगळता तालुकाभरातून अल्प प्रतिसाद लाभला. काही पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. पण, त्यांनी दूर राहाणे पसंत केले. दोन्ही काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे राजापुरात या यात्रेचा खूपच बोजवारा उडाला अशी चर्चा सर्वत्र सुरू होती.अनेक आमदार गाडीतचया यात्रेसाठी आलेल्या आमदारांपैकी प्रमुख आमदारच आलेल्या खासगी बसमधून उतरले, तर काही आमदार एअरकंडिशन गाडीत बसून राहिले. त्यामुळे हे आमदार नक्की कशासाठी आले होते? अशी चर्चा नंतर सुरू होती.
आघाडी कोकणवासियांच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2017 12:41 AM