कोल्हापूर : शहरातील मिळकतधारकांवर लादण्यात येणारा संभाव्य घरफाळा वाढीचा प्रस्ताव फेटाळण्याचे आदेश काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुक्रवारी रात्री नगरसेवकांना दिले.काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व नगसेवकांची बैठक शुक्रवारी रात्री उशिरा देशमुख हॉल येथे पार पडली. या बैठकीला आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर उपस्थित होते. बैठकीत घरफाळावाढीची आमदार मुश्रीफ व आमदार पाटील यांनी माहिती घेऊन चर्चा केली. सर्वच नगरसेवकांनी यावेळी घरफाळा वाढविणे योग्य नसल्याचे सांगितले. शेवटी हा प्रस्ताव फेटाळण्याचा आदेश नेत्यांनी नगरसेवकांना दिला. (प्रतिनिधी)
घरफाळावाढीचा प्रस्ताव फेटाळण्याचा नेत्यांचा आदेश
By admin | Published: February 20, 2016 12:47 AM