सत्ता असो अथवा नसो. सतत समाजासाठी कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्याला लोक स्वीकारतात. सत्तेचा दर्प चढू न देता कार्यरत राहणे आणि सत्ता नसतानाही नाराज न होता पूर्वीच्याच जोमाने सक्रिय होणे .हे राजकारणात सर्वांनाच जमते असे नाही. पण ज्यांना हे जमते ते मास लिडर असतात. समरजितसिंह घाटगे यांना हे तंतोतंत लागू होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्हा पिंजून काढणारे आणि शिवार संवादासाठी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचणारे समरजितसिंह हे जिल्ह्यातील एकमेव युवा राजकारणी आहेत.
पुणे म्हाडाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले हे पद होते. पण ग्रामीण भागात काम करण्यासाठी फारसे उपयोगी नव्हते.तरी सुद्धा आपल्या कौशल्याने त्यांनी अनेक प्रकल्प सुरू केले.
कागललाही एक प्रकल्प आणला. तोच प्रकल्प आज महाविकास आघाडी शासनानेही पुढे सुरू ठेवला आहे.
विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगली मते घेतली, पण पराभव झाला. त्याने खचून न जाता ते दुसऱ्या दिवसापासून पुन्हा सक्रिय झाले. कार्यकर्त्यांना आधार दिला. गेली वर्षभर पूर्वीप्रमाणे ते सक्रिय आहेत. विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी शिरावर घेतली आहे. विशेषतः शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. सत्तांतरानंतरचा राज्यातील विरोधी पक्षाचा पहिला मोर्चा कोल्हापुरात त्याच्यांच संकल्पनेतून निघाला. समरजितसिंह घाटगे हे नाव राज्यभर पोहचले.
शाहू सहकारी साखर कारखाना आणि संलग्न सर्व संस्थांचे नेतृत्व करीत असताना सहकार चळवळीला मजबूत करण्यासारखे काम ते करीत आहेत. एका निश्चिंत ध्येयाने ते समाजकारण आणि राजकारण करीत आहेत. युवा पिढीच्या गळ्यातील ताईत बनलेले समरजितसिंह आज खऱ्या अर्थाने युवा नेतृत्व ठरले आहेत. ( कागल प्रतिनिधी)