शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

टोल आंदोलनातून नेत्यांचा काढता पाय

By admin | Published: September 19, 2014 11:53 PM

निवडणुकांचा परिणाम : आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय

कोल्हापूर : गेली तीन वर्षे टोलविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचे आदेश आम्ही जमिनीवर बसून मानले. आता निवडणुकीच्या तोंडावर या सर्वच खुर्चीवरील नेत्यांनी काढता पाय घेतला आहे. नेत्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविली तरीही चार कार्यकर्त्यांसह का असेना, आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आज, शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या या बैठकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिलीप देसाई, अशोक पोवार, बाबा इंदुलकर, प्रशांत जाधव, बाबा पार्टे, जयदीप शेळके, प्रशांत जाधव, अजित सासने, बजरंग शेलार, आदींसह ५०हून अधिक विविध राजकीय व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसारमाध्यमांपासून दूर काहीशा गुप्तपणे झालेल्या बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणाने भावना व्यक्त केल्या. कृती समिती राजकारणापासून लांब होती अन् राहील. कोणाला निवडून आणण्यासाठी किंवा गाडण्यासाठी कृती समिती स्थापन झालेली नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर आंदोलनाची धग टोलप्रश्न मिटेपर्यंत तेवत ठेवण्याचे बैठकीत ठरले. उद्या, शनिवारी दुपारी चार वाजता कृती समितीचे कार्यकर्ते शाहू टोल नाक्यावरील ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांची वाढलेली मुजोरी व दादागिरीबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहेत. त्यानंतर पाच वाजता राजारामपुरीतील मारुती मंदिर चौकात जाहीर सभा होणार आहे. निमंत्रक गैरहजरकृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे गेल्या साडेतीन वर्षांत प्रथमच आजच्या बैठकीला गैरहजर राहिले. निवास साळोखे यांनी दक्षिण मतदार संघातून भाजपकडून उमेदवारीची मागणी केली आहे. याबाबत ते म्हणाले, मला कोणत्याही पक्षाचे लेबल नव्हते, याचा अर्थ भविष्यात मी कोणत्याही पक्षात प्रवेश करायचा नाही, असे होत नाही. यापुढेही मी टोल आंदोलनात सक्रिय असेन.