कोल्हापूर : कळंबा रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वस्थ व तंदुरुस्त भारत संकल्पनेविषयी आयोजित करण्यात आलेली जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली होती.
या प्रभातफेरीची सुरुवात आयटीआय-संभाजीनगर, मंगळवार पेठ, मिरजकर तिकटीमार्गे बिंदू चौक येथे समाप्ती करण्यात आली. यामध्ये ५० विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सहभाग घेतला होता. यावेळी प्राचार्य रवींद्र मुंडासे, उपप्राचार्य दत्ता पाठक, अनिल बामणे, अमोल आंबी, उत्तम माने, एस. बी. कांबळे, ए. पी. कांबळे, किरण साळुंके, महेश नरवडे, नामदेव पाटील, रंगराव संकपाळ, आदी उपस्थित होते
‘स्वयम्’मध्ये ‘दिव्यांग दिन’ साजरा
कोल्हापूर : न्यायनगरीतील ‘स्वयम्’ मुलांच्या शाळेतील शिक्षकांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. यासोबतच मास्क, सॅनिटायझर, चित्रकला वही, रंगपेटी, कार्यशाळा वही, आदींचे वाटपही केले. कोरोनाकाळात कशी काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांचेही प्रबोधन करण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने पालकांची बैठक घेण्यात आली. यात दिव्यांगांसंदर्भात कोविड काळात घ्यावयाची काळजी याबाबत बालरोगतज्ज्ञ डाॅ. सुहास कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.