लोकमत न्यूज नेटवर्कपांगिरे : चिकोत्रा खोºयातील सुमारे ५२ गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी वरदायी ठरलेल्या चिकोत्रा धरणाच्या सर्व्हिस गेटलाच मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. तीन वर्षांपासून ही गळती काढण्यास पाटबंधारे विभागास अपयश येत आहे. त्याचा परिणाम धरण भरण्यावर होत आहे. धरणाच्या मुख्य भिंतीला पॅनस्टोकपाईपच्या बाजूने गळती सुरू असून, त्यामुळे भविष्यात धरणाच्या भिंतीला धोका आहे.धरणाच्या सर्व्हिस गेटची गळती थांबविण्यासाठी पाटबंधारे विभागाने तत्काळ उपाययोजना करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा शिवसेना भुदरगड उपतालुकाप्रमुख अशोकराव पाटील यांनी दिला आहे.म्हातारीचे पठार तसेच दिंडेवाडी परिसरातील ओढ्याचे वाया जाणारे पाणी दीड टीएमसी क्षमतेच्या चिकोत्रा धरणात वळविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून अनेक प्रयत्न सुरू असतानाच धरणाच्या गळतीचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेली तीन वर्षांपासून धरणाच्या सर्व्हिस गेटलाच गळती सुरू असून ही गळती अद्याप काढण्यास पाटबंधारे विभागास यश आलेले नाही. पॉवर हाऊस जेथे उभारण्यात आले आहे, त्याच्याच बाजूला हे सर्व्हिस गेट आहे. धरणाच्या मुख्य हॉल्वमधून पुढे या सर्व्हिस गेटमध्ये पाणी येते. सध्या साधारणत: १०० ते १५० एच.पी. मोटर्सने जेवढे पाणी बाहेर पडते तेवढे पाणी या सर्व्हिस गेटमधून चोवीस तास सतत बाहेर पडून नदीपात्रात वाहून जात आहे. ही गळती शोधण्यासाठी गेल्या एप्रिल महिन्यात पाणबुडीची मदत घत्ोली होती. या सर्व्हेनुसार सर्व्हिस गेटची गळती काढण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. त्यासाठी निधीची तरतूद झाली. मे महिन्यात काम सुरू करणे गरजेचे होते; पण पाटबंधारे विभागाने त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने जून महिन्याच्या अखेरीस हे काम सुरू केले. त्यानंतर पावसास सुरुवात झाल्याने व धरणातील पाणी वाढत गेल्याने हे काम अर्धवट थांबविण्यात आले. आतापर्यंत हे काम अर्धवटच राहिले. पावसाळ्याच्या सुरुवातीस या सर्व्हिस गेटमधून कमी प्रमाणात पाणी येत होते; पण आता धरणातील दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून वाहून वाया जात आहे. गळती काढण्यापूर्वी पाणी कमी जात होते; पण हे काम केल्यानंतर गळतीचे प्रमाण वाढले आहे. पाटबंधारे विभागाने सदरचे सर्व्हिस गेटचे काम करूनही ही गळती आहे तशीच राहिली आहे.साधारणत: १५ मे रोजी पाण्याचे सर्व्हिस गेटमधून पाणी सोडणे बंद करण्यात आले पण या गळतीमुळे आतापर्यंत दररोज लाखो लिटर्स पाणी वाहून वाया जात आहे. सदरच्या गेटच्या गळतीमुळे पाणी वाहून गेले नसते तर धरणामध्ये आतापर्यंत साधारणत: ४५ ते ५० टक्के इतका पाणीसाठा झाला असता. धरणपात्रात येणाºया पाण्यापेक्षा या गेटमधून बाहेर पडणाºया पाण्याचे प्रमाण जास्त असल्याचे या ठिकाणी पाहिल्यानंतर लक्षात येते. साधारणत: जुलै महिन्यापासून पात्रातील पाण्याचा दाब वाढल्यानंतर पाणी जास्त प्रमाणात वाहून जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून या सर्व्हिस गेटची गळती काढण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करीत आहे. हे काम करण्यासाठी साधारणत: तीन ते चार तास मुख्य गेटमधून पूर्ण क्षमतेने पाणी सोडावे लागणार आहे; पण हे पाणी सोडायचे की नाही या घोळात गेली तीन वर्षे हे काम रेंगाळत पडले आहे. परिणामी, या गळतीमुळे धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. या गेटमधून होणारी गळती सहजासहजी लक्षात येत नाही व पाटबंधारे विभागानेही सदर गळतीबाबत कोणाला कळू दिलेले नाही. त्यामुळे या प्रकारास नेमके जबाबदार कोण, असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मेनगेटला एअरव्हॉलचे लिकीजचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाहून जाते. तेव्हा हे कामही पूर्ण होणे गरजेचे आहे. तरच धरणामध्ये बºयापैकी पाणीसाठा होऊन हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी वर्षभर वापरण्यासाठी व्यवस्थितरित्या नियोजन करणे शक्य होईल.गेल्या दोन वर्षांत हे धरण ७५ टक्केही भरलेले नाही. गतवर्षी पाऊस चांगला होऊनही ६८ टक्केपर्यंत धरण भरले होते. तर सन २०१४-१५ मध्येही केवळ ४६ टक्के इतकाच पाणीसाठा झाला होता. यंदा धरणात आजअखेर केवळ ३४ टक्के साठा झाला आहे.कालव्याला गळती : जमिनीत पाणी मुरतेधरणाच्या भिंतीलगत पॅनस्टोकपाईपच्या बाजूने गळती असून, त्यामुळे धरणाच्या भिंतीला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने वेळीच सर्व्हे होणे गरजेचे आहे. तसेच सर्व्हिस गेटमधूनजे पाणी सध्या बाहेर पडते तेपाणी सिमेंटकाँक्रीटद्वारे बांधण्यात आलेल्या कनॉलमधून पुढेनदीपात्रात जाते. पण सध्या या कनॉलची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, हे पाणी नदीपात्रातसरळ वाहून न जाता कॅनॉलमधून गळतीद्वारे जमिनीत मुरले जात आहे. त्यामुळे कॅनॉलची गळती काढणे गरजेचे बनले आहे.गेल्या तीन वर्षांपासून ही गळती असून, पाटबंधारे विभागाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले असल्याने धरणातील लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे. या कामासाठी हजारो रुपये खर्च करूनही हे काम व्यवस्थित झालेले नाही. सदर गळतीचे कामवेळीच केले नाही, तर धरणात सध्या साठाझालेले पाणी वाहून वाया जाऊन उन्हाळ्याततीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे.तेव्हा पाटबंधारे विभागानेही सर्व्हिस गेटच्यापाणी गळतीची बाब गांभीर्याने घेऊन तत्काळ उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे भुदरगड उपतालुकाप्रमुख अशोकराव पाटील यांनी दिला आहे. यावेळी सागर गुरव, जोतिराम कांबळे,बाबूराव राऊत, सुधीर शिंदे, गणपती रामाणे,आदी उपस्थित होते.
चिकोत्रा धरणाच्या सर्व्हिस गेटला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:45 PM