प्रादेशिक गांधीनगर नळपाणी पुरवठा योजना ही गांधीनगरसह तेरा गावांत राबिवली जाते. ही योजना गांधीनगर, वळिवडे, गडमुडशिंगी, उचगाव, मणेरमळा, शांतिनगर, उजळाईवाडी, कणेरी, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, आर. के. नगर, पाचगाव या गावांसाठी आहे. या गावांत प्रादेशिक गांधीनगर नळपाणी पुरवठा योजनेशिवाय दुसरी कोणतीच कायमस्वरूपी योजना नसल्याने पाण्यासाठी नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात. काही गावांत वाॅर्डवाईज एक दिवसआड पाणी सोडण्यात येते, तर अनेक ठिकाणी जुन्या पाईपलाईन फुटण्याचे प्रमाणही वाढल्याने पाणी येण्यास विलंब होत असतो.
चौकट
नवी योजना हवीच
गांधीनगर नळपाणी योजनेला पर्याय म्हणून प्रत्येक गावाने नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरज आहे. या योजनेच्या थकबाकीची रक्कमही भरमसाट आहे. यामुळे मेटाकुटीला आलेल्या गावात नवीन स्वतंत्र अशी पाणी योजना राबविण्याची आवश्यकता आहे.
फोटो;
गांधीनगर नळपाणी योजनेला गळती :
पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता.