शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आयजीएमच्या इमारतीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:44 PM

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झाले असले तरी रुग्णालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अशा इमारती अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झालेल्या नाहीत. परिणामी इमारतींची डागडुजी झाली नसल्याने पावसाळ्यात इमारतींना गळती लागली आहे. तर तटबंदीच्या कुंपणभिंतीची पडझड झाल्यामुळे दवाखान्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे.नगरपालिकेचे असलेले आयजीएम रुग्णालयाला दरवर्षी सुमारे अडीच कोटींहून ...

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित झाले असले तरी रुग्णालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अशा इमारती अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झालेल्या नाहीत. परिणामी इमारतींची डागडुजी झाली नसल्याने पावसाळ्यात इमारतींना गळती लागली आहे. तर तटबंदीच्या कुंपणभिंतीची पडझड झाल्यामुळे दवाखान्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे.नगरपालिकेचे असलेले आयजीएम रुग्णालयाला दरवर्षी सुमारे अडीच कोटींहून अधिक रुपयांचा तोटा होऊ लागल्याने नगरपालिकेला रुग्णालय चालवणे आर्थिकदृष्ट्या आर्थिक अडचणीचे ठरले. त्यामुळे रुग्णालय शासनाने हस्तांतरित करून घ्यावे, असा प्रस्ताव नगरपालिकेने शासनासमोर ठेवला. रुग्णालय वर्ग करून घेण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी शासनदरबारी जोरदार प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ३० जून २०१६ रोजी रुग्णालय शासनाकडे वर्ग करून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.आयजीएम रुग्णालय २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासनाकडे वर्ग करून घेण्यात आले आणि त्या दिवशीपासून रुग्णालयाकडील बाह्यरुग्ण विभाग शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केला, असे असले तरी शासनाच्या आरोग्य खात्याकडे रुग्णालय व त्याकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवर्ग करून घेण्याची प्रक्रिया रखडली.मार्च २०१७ अखेर नगरपालिकेने अधिकारी व कर्मचाºयांच्या पगाराची तरतूद केली होती; पण शासनाच्या आरोग्य खात्याकडे आयजीएम रुग्णालयाकडील अधिकारी व कर्मचाºयांच्या पगाराची तरतूद नसल्याने सुमारे नऊ महिने त्यांचे पगार झाले नाहीत. अखेर नऊ महिन्यांनंतर अधिकारी व कर्मचाºयांच्या पगाराची तरतूद करण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात रुग्णालयाकडील सर्व सेवा कोलमडून पडली.शासनाने ‘आयजीएम’साठी पहिल्या टप्प्यात १५७ व दुसºया टप्प्यात ६३ पदांना मंजुरी दिली. त्यापैकी १४८ पदे अद्यापही रिक्त आहेत. अशा स्थितीमध्ये बाह्यरुग्ण विभाग, तसेच प्रसूती, अस्थिरोग, एक्स-रे, प्रयोगशाळा व काही शस्त्रक्रिया इतके विभाग ठरावीक मर्यादेपर्यंत सुरू आहेत. रुग्णालयाकडे मंजूर असलेल्या सर्व पदांची भरती झाली आणि आवश्यक असलेली सर्व यंत्रसामग्री शासनाने उपलब्ध केली, तर हे रुग्णालय लवकरच आंतररुग्ण विभागाकडील २०० खाटांसह सुरू होईल, अशी माहिती दवाखान्याकडील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवीकुमार शेट्ये यांनी दिली.तसेच रुग्णालयासाठी शासनाने सात लाख रुपये औषधासाठी मंजूर केले आहेत. नजीकच्या दोन-तीन आठवड्यांमध्ये दवाखान्यासाठी आवश्यक असलेली औषधे खरेदी केली जातील. ज्यामुळे रुग्णालयात सध्या देण्यात येणाºया उपचारापेक्षा अधिक चांगले उपचार रुग्णांना मिळू लागतील, असेही डॉ. शेट्ये यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी डॉ. श्रीकांत सूर्यवंशी व दवाखान्याचे प्रभारी भरत शिंदे उपस्थित होते.‘आयजीएम’ हस्तांतराची प्रक्रिया तुलनेने चांगलीइचलकरंजीचे आयजीएम रुग्णालय शासनाने हस्तांतरित करून घेण्यापूर्वी मालेगाव, भिवंडी, मीरा भार्इंदर येथील रुग्णालये शासनाकडे वर्ग करण्यात आली आहेत.तेथील रुग्णालयांची वर्ग करून घेण्याची रेंगाळलेली प्रक्रिया पाहता इचलकरंजीचे रुग्णालय वर्ग करून घेण्यामध्ये चांगली गती आहे, असेही डॉ. शेट्ये यांनी सांगितले.