१९८६ मध्ये तत्कालीन पाटबंधारेमंत्री मल्हारगौडा पाटील यांच्या प्रयत्नातून ४० बाय ३० आकाराचा स्मशानशेड उभारण्यात आले आहे.
दरम्यान, याच शेडमध्ये दहा वर्षांपूर्वी एकाचवेळी तीन मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक लोखंडी बेडची सोय उपलब्ध केली आहे.
१९८६ नंतर स्मशानशेडवरील पत्रे आजअखेर बदलण्यात आलेले नाही. मृतदेहाला लावण्यात येणाऱ्या आगीच्या झळा व धुरामुळे स्मशानशेडचे पत्रे पूर्णत: गंजून खराब झाले आहेत. पावसाळ्यात गंजलेल्या पत्र्यातून पाणी शेडमध्ये सर्वत्र आत येत असून, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात व्यत्यय येत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गंजलेले पत्रे त्वरित बदलावेत, अशी जनतेची मागणी आहे.
--
फोटो ओळी : संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीकाठावर असणाऱ्या स्मशान शेडच्या पत्र्यांची झालेली दुरवस्था.
क्रमांक : २२०३२०२१-गड-०३