शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

गळतीच्या पाण्याची बचत

By admin | Published: May 01, 2016 12:45 AM

‘क्रॉस’चे आव्हान पेलले : नियोजनबद्ध काम; ५0 लाख लीटर वाचले

कोल्हापूर : शिंगणापूर पाणी योजनेच्या चार मोठ्या गळती, नवीन पाईपलाईनचे चार ठिकाणी एकाचवेळी जोडकाम असे आव्हानात्मक काम महापालिका पाणीपुरवठा विभागाने नियोजित वेळेपेक्षाही कमी वेळेत पूर्ण केले. दोन दिवसांत केलेल्या या कामांमुळे महापालिकेच्या गळतीमधून वाया जाणारे दर दिवसांचे सुमारे ५० लाख लिटर पाणी वाचले आहे. सलग २० तास पाणी उपसा पंप बंद ठेवून अहोरात्र सुमारे १०० कर्मचारी व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून एकाचवेळी काम सुरू करून तीन दिवसांचे काम अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करून ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर शहरात उद्भवणाऱ्या पाणीबाणीवर मात केली. विशेष म्हणजे, हे काम सुरू असताना जाहीर केल्याप्रमाणे निम्म्या शहरात पाणीटंचाईचे सावट असतानाही त्या भागात सुमारे २७ टँकरद्वारे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा केला. त्यामुळे नागरिकांची, नगरसेवकांची एकही तक्रार झाली नाही. कोल्हापूर शहरात सध्या एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातच शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीची चार ठिकाणी असलेली गळती काढण्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आल्याने शहराच्या निम्म्याहून अधिक भागांतील पाणीपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे शहरात पाण्याची अभूतपूर्व कृत्रिम टंचाई निर्माण झाली. गुरुवारी सकाळी सहा वाजता शिंगणापूरहून पुईखडीला नेण्यात येणाऱ्या चार पंपांद्वारे पाण्याचा उपसा बंद केला. त्यानंतर जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह रिकामे करणे, पाणी बाहेर काढणे, गळती काढणे, जुन्या पाईप तोडून नव्या पाईपला जोडणे, वेल्डिंग, आदी कामे अहोरात्र पूर्ण करून शुक्रवारी रात्री १२ वाजता शिंगणापूर योजनेचे चारही उपसा पंप एकापाठोपाठ सुरू करून जलवाहिनी सुरू केली. त्यानंतर शनिवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर योजनेवर आधारित असणाऱ्या बहुतांशी पाण्याच्या टाक्या काही प्रमाणात भरून त्याद्वारे सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान पाणीपुरवठा विभागाने पेलले आहे. प्रथमच एकावेळी चार क्रॉस बदलले४दोन दिवस अहोरात्र जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. विशेष म्हणजे या कामात कोणताही अडथळा आला नाही. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई, त्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा अशा अवस्थेत हे काम करताना नागरिकांची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. ४त्यासाठी सुमारे १५ दिवस अगोदर गळतीच्या ठिकाणी खोदण्यात आले, तर नव्या जलवाहिनीला जोडण्यात येणाऱ्या ठिकाणीही यापूर्वीच खोदाई केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष गुरुवारी उपसा थांबविल्यानंतर कामाला सुरुवात केली, ते सुमारे वीस तासांनंतरच काम पूर्ण करूनच थांबविले. ४एकाचवेळी चार ठिकाणी जलवाहिनीवर क्रॉस टाकण्याचे धाडसाचे काम प्रथमच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पेलले.आजपासून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठाकोल्हापूर : जलवाहिनीला ‘क्रॉस’ व गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्यानंतर शनिवारपासून शहरात पाणीपुरवठा सुरूझाला; पण कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने बहुतांश भागात टँकरनेच पाणीपुरवठा केला. दिवसभरात २७ टँकरद्वारे ११० फेऱ्यांद्वारे कृत्रिम पाणीटंचाईवर मात करता आली. सर्वच भागात आज, रविवारपासून नियोजनानुसार एक दिवसाआड पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले. गुरुवारपासून फुलेवाडी जकात नाका, रिंगरोडवरील अयोध्या कॉलनी, नवीन वाशी नाका, ए-वन गॅरेज पुईखडी या चार ठिकाणची मोठी गळती काढण्याचे काम, तसेच जुन्या जलवाहिनीतील पाणीपुरवठा नव्या जलवाहिनीद्वारे करण्यासाठी ‘क्रॉस’ टाकण्याचे काम एकाच वेळी सुरु केल्यानंतर गुरुवारपासून शिंगणापूर येथून चारही पंपांद्वारे होणारा उपसा थांबविला होता. ही आव्हानात्मक कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शुक्रवारी मध्यरात्री शिंगणापूर पाणी योजनेचे चारही उपसा पंप कमी क्षमतेने सुरू करून चाचणी घेण्यात आली. पहाटेनंतर पाणी उपसा करून टाक्या भरल्या; पण कमी कालावधीमुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण न भरल्याने राजारामपुरी, साळोखेनगर, ए वॉर्ड, मंगळवार पेठ, आदी भागांत पाणीपुरवठा झालाच नाही. त्यामुळे या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. शहरात आज, रविवारपासून एक दिवसाआड पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. सणगर गल्लीत टँकरदरम्यान, मंगळवार पेठेतील सणगर गल्लीत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. शनिवारी सकाळी या गल्लीत टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना महिलांत वादावादीचे प्रसंग निर्माण झाले; पण भागातील ज्येष्ठांनी हा वाद मिटविला.