शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
3
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
4
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
5
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
6
सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ
7
Baba Siddiqui : फोन इंटरनेटचा वापर न करता कसा रचला कट?; बाबा सिद्दिकी हत्येतील आरोपीचं रहस्य उघड
8
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
9
'महागाईविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही' डिसेंबरमध्ये EMI घटणार? RBI ने दिले संकेत
10
"सीआरपीएफचे जवान नसते तर...", मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी जिरीबाममधील हल्ल्याची दिली माहिती
11
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
12
"आलियाला कपडे बदलायचे होते अन् क्रू मेंबर..." इम्तियाज अलीचा धक्कादायक खुलासा
13
Sensex-Nifty ग्रीन झोनमध्ये, बँक निफ्टी मजबूत; Adani Ent, Adani Port सह मेटल शेअर्स आपटले 
14
वडिलांनी खरेदी केलेल्या पहिल्या बाइकवर बसला भाईजान! बाप-लेकाचा फोटो पाहून चाहते म्हणतात- "स्वॅग असावा तर असा!"
15
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
16
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
17
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
18
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
19
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
20
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस

डाव्यांनी लढणे सोडल्याने निवडणूक विसरले, एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यावर होती पकड 

By राजाराम लोंढे | Published: October 23, 2024 1:51 PM

संघटनात्मक बांधणीत अपयश : नव्या नेतृत्वाने मरगळ झटकण्याची गरज

राजाराम लोंढेकोल्हापूर : एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या डाव्या पक्षांची आज अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी लढणेच सोडून दिल्याने त्यांना निवडणुकांचा विसर पडला की काय? अशी चर्चा सुरू आहे. काळानुरूप नवीन नेतृत्व तयार करून संघटनात्मक बांधणी करणे अपेक्षित होते; पण तसे झाले नसल्यानेच विशेषता शेतकरी कामगार पक्ष, जनता दलाची ताकद कमी झाली आहे.

साधारणता ५० वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्हा म्हणजे डाव्या पक्षांचा बालेकिल्ला अशी ओळख होती. शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, ‘भाकप’, ‘माकप’ने या पक्षांनी जिल्ह्याला आमदार, खासदार दिले. ‘लाल टोपी’चा दबदबा राजकारणावर होता. त्याच कालावधीत काँग्रेसची लाट आल्यानंतरही ‘डाव्या’ पक्षांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम केले.विधानसभेच्या १९७२ च्या निवडणुकीत कोल्हापुरातून त्र्यंबक कारखानीस हे पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतरच्या काळात एकाचे तीन आमदार निवडून आणून आपला करिष्मा दाखवून तर दिलाच; पण १९७८, १९८०, १९८५, १९९०, १९९५ व १९९९ मध्ये डाव्या पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळात प्रतिनिधित्व केले; पण त्यानंतर अनेकजण निवडणुकीला सामोरे गेले; पण एकालाही यश मिळाले नाही. डाव्या पक्षांत नवे नेतृत्व उदयास आले आहेत; पण त्यांनी मरगळ झटकण्याची गरज आहे.

२५ वर्षांपूर्वी डाव्यांवर गुलालविधानसभेच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत प्रत्येक वेळी ‘शेकाप’, ‘जनता दल’, ‘भाकप’, ‘माकप’ या डाव्या पक्षांनी उमेदवार दिले; पण १९९९ ला संपतराव पवार यांच्या रूपाने शेवटचा गुलाल डाव्या पक्षांना मिळाला होता.

नवीन पिढीची चळवळीकडे पाठ‘डावे’ म्हणजे सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकऱ्यांचे पक्ष अशीच त्यावेळी धारणा होती; पण ज्यावेळी पक्षाची हुकमत होती, त्यावेळी तरुण नेतृत्वाला अपेक्षित संधी न मिळाल्याने पक्षवाढीला मर्यादा आल्याचे बोलले जाते. त्यामुळेच नवीन पिढीने चळवळीकडे पाठ फिरवली.

आतापर्यंत ‘डाव्या’ पक्षांचे झालेले आमदारनिवडणूक - मतदारसंघ - विजयी उमेदवार - पक्ष१९७२ - कोल्हापूर - त्र्यंबक कारखानीस - शेकाप१९७८ - इचलकरंजी - शिवगोंडा पाटील  - कम्युनिस्ट१९७८ - कोल्हापूर - रवींद्र सबनीस -  जनता पक्ष१९७८ - वडगाव - नानासाहेब माने  - जनता पक्ष१९८० - शिरोळ - दिनकरराव यादव - शेकाप१९८५ - सांगरुळ - गोविंदराव कलिकते -  शेकाप१९८५ - गडहिंग्लज - श्रीपतराव शिंदे  - जनता दल१९९० - इचलकरंजी - के. एल. मलबादे -  माकप१९९० - राधानगरी - शंकर धोंडी पाटील - जनता दल१९९० - गडहिंग्लज - श्रीपतराव शिंदे - जनता दल१९९५ - सांगरुळ - संपतराव पवार -  शेकाप१९९९ - सांगरुळ - संपतराव पवार - शेकाप

अजूनही येथे आहे डाव्यांची ताकद :‘करवीर’, ‘राधानगरी’, ‘शाहूवाडी’, ‘काेल्हापूर दक्षिण’, ‘कागल’, ‘कोल्हापूर उत्तर’, ‘इचलकरंजी’.

जुन्या-नव्यांचा मिलाफ करत पक्ष मजबुतीच्या दृष्टीने आम्ही पाऊले टाकली आहेत. आगामी काळात तुम्हाला मजबूत पक्ष म्हणून ‘शेकाप’ दिसेल. - बाबासाहेब देवकर (राज्य सहचिटणीस, शेकाप) 

सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याचे काम आतापर्यंत डाव्या पक्षांनी केले. मात्र, दुर्दैवाने निवडणुकीच्या रिंगणात यश मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला सत्तेपेक्षा गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. - चंद्रकांत यादव (ज्येष्ठ नेते, माकप)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण